Home » अकोला, नागपूर, भंडाऱ्यासह राज्यातील १८९ बंदीवान मुक्त होणार

अकोला, नागपूर, भंडाऱ्यासह राज्यातील १८९ बंदीवान मुक्त होणार

by नवस्वराज
0 comment

नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील १८९ बंदीवानांना कारागृहातून मुक्त करण्यात येणार आहे. चांगली वागणूक आणि हातून घडलेल्या गुन्ह्याबद्दल पश्चातापाच्या भावनेमुळे या बंदीवानांची शिक्षा माफ करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्याला शासनाने मंजुरी दिली आहे. वयाची पन्नाशी ओलांडलेल्या महिला बंदीवान आणि ५० टक्क्यांपेक्षा जास्त शिक्षा भोगलेल्या बंदीवानांचा यात समावेश आहे.

कारागृह विभागाच्या अप्पर महासंचालक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील ५९ बंदीवानांची शिक्षा माफ करण्यात आली आहे. यात नागपूर मध्यवर्ती कारागृह, अकोला कारागृह आणि भंडारा कारागृहातील बंदीवानांचा समावेश आहे. विदर्भात एकुण ११ कारागृहांमधुन बंदीवानांची माहिती मागविण्यात आली होती. कारागृह अधीक्षकांनी ही माहिती कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या कार्यालयाला पाठविली होती. उपमहानिरीक्षक कार्यालयाने अप्पर महासंचालक कार्यालय व त्यांनी शासनाला बंदीवानांबाबत माहिती पाठविली होती. शासनासह सर्वच स्तरातून बंदीवानांच्या वागणुकीबद्दल खातरजमा करून घेतल्यानंतर राज्यातील १८९ बंदीवानांची शिक्षा माफ करण्यात आली. त्यात विदर्भातील ५९ जणांचा समावेश आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!