Home » पहिल्या टप्प्यात 18 जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

पहिल्या टप्प्यात 18 जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

by नवस्वराज
0 comment

मुंबई : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सत्तारुदढ झाल्यानंतर 38 दिवसानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. 18 मंत्र्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

शिंदे गटाकडून दीपक केसरकर, गुलाबराव पाटील, उदय सामंत, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, दादा भुसे, शंभुराज देसाई, तानाजी सावंत आणि संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखेपाटील, सुरेश खाडे, विजयकुमार गावित, अतुल सावे आणि रवींद्र चव्हाण यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. शिंदे गटाकडून 9 आणि भाजपकडून 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळ विस्तारात अपक्षांना स्थान देण्यात आलेले नाही. शिंदे गटाने एकाही अपक्ष आमदाराला मंत्रिपद दिले नाही.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!