वर्धा : वर्धा जिल्ह्यातील १७ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले. सहा महिने ते एक वर्षाच्या कालावधीकरिता या गुन्हेगारांकरिता तडीपार करण्यात आले. त्याबाबतचा प्रस्ताव पाेलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी मंजूर केला आहे.
पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी जिल्ह्यात ज्यांना गंभीर गुन्हे करण्याची सवयी आहे, लोकांमध्ये दहशत निर्माण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, घातक शस्त्र बाळगणे, जुगारबंदीचे गुन्हे करणारे, दारुबंदी कायदयान्वये गुन्हे करणारे, शासकीय कर्मचार्यांवर हल्ला करणारे व्यक्ती विरुध्द मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वये तडीपार प्रस्ताव सादर करण्याबाबात आदेश दिले हाेते. त्यानुसार पोलीस स्टेशन वर्धा शहर, रामनगर, सेवाग्राम, सावंगी, सेलू व देहेगाव (गोसावी) ठाणेदार यांनी प्रस्ताव सादर केले.
पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी प्रस्ताव मंजूर करीत वर्धा जिल्ह्यातील १७ सराईत गुन्हेगारांना तडीपार केले आहे. यामध्ये रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत राजेश शामलाल जयस्वाल (रा. वर्धा), मनोज सुरेश जयस्वाल (रा. पोद्दार बगीचा वर्धा), मयूर देवराव तुपट (रा. गजानन नगर वर्धा), मोहन मोतीलाल कलसे (रा. इंदिरानगर, वर्धा) यांचा तडीपारीत समावेश आहे.
वर्धा पोलीस स्टेशन शहरअंतर्गत अक्षय दिगांबर पटले (रा. बोरगाव मेघे), सागर ज्ञानेश्वर घोडे (रा. बोरगाव मेघे), अमोल ऊर्फ बंदी महेंद्र शंभरकर (रा. तारफैल), अज्जु वासुदेव राठोड (रा. बोरगाव मेघे), मनीष प्रसादीलाल ताराचंदी (रा. आनंदनगर, वर्धा) यांना तडीपार करण्यात आले आहे.
सेवाग्राम पोलीस स्टेशन अंतर्गत चंद्रकांत पुरुषोत्तम लोहकरे (रा. वरुड), सुरेश किसनाजी मून (रा. मदनी), राहुल पंडीत ईखार (रा. पवनार), पोलीस स्टेशन सावंगी अंतर्गत योगेश दिवाकर पेटकर (रा. सावंगी मेघे), रोशन रामदास ठाकरे (रा. साटोडा), पोलीस स्टेशन सेलूअंतर्गत प्रवीण शत्रुघ्न धावडे (रा. तळोदी), किशोर गजानन पोटे (रा. सेलू), पोलीस स्टेशन दहेगावअंतर्गत पिंटू रामदास पवार (रा. हमदापूर) या गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.