Home » Shiv Sena : मालमत्ता कराच्या विषयावर अकोला येथे शिवसेना आक्रमक

Shiv Sena : मालमत्ता कराच्या विषयावर अकोला येथे शिवसेना आक्रमक

Rajesh Mishra : महापालिकेत दिला ठिय्या; साहित्याची तोडफोड

0 comment

Akola Corporation : मालमत्ता कराच्या विषयावर अकोला येथे शिवसेना उद्धव ठाकरे गट पुन्हा आक्रमक झाला आहे. मालमत्ता करवसुली करणाऱ्या स्वाती इंडस्ट्रीज कंपनी नागिरकांना वेठीस धरत असल्याचा आरोप करीत थकीत करावरील व्याज रद्द करावे तसेच स्वाती इंडस्ट्रीजला दिलेले कंत्राट रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटातील अकोला पश्चिमचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात महापालिका कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. मिश्रा यांच्या नेतृत्वात मालमत्ता कर विभागाला कुलूप ठोकुन जलप्रदाय विभागाच्या खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली.

अकोल्यात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray) मालमत्ता कराच्या मुद्द्यावर चांगलाच आक्रमक झाला आहे. भाजपला कोंडीत पकडण्यासाठी राजेश मिश्रा आणि ठाकरे गट विविध मार्गाने आंदोलन करीत आहे. अशातच सोमवारी (ता. 26) थकीत करावरील व्याज रद्द करावे आणि स्वाती इंडस्ट्रीजला दिलेले कंत्राट रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. शिवसैनिक एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी जलप्रदाय कार्यालयातील अधिकाऱ्यांची खुर्ची बाहेर आणून तोडली.

शिवसेनेच्या अकोल्यातील आंदोलनाचा व्हिडीओ बघण्यासाठी क्लिक करा :

राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात माजी नगरसेविका मंजुषा शेळके, तरुण बगेरे, अनिल परचुरे, गजानन बोराळे, सुरेंद्र विसपुते, पिंटू बोंडे, अंकुश शिंत्रे, सतीश नागदिवे, राजेश इंगळे, देवा गावंडे, अविनाश मोरे, बाळू ढोले, पंकज बाजोड, रोशन राज, आकाश राऊत, योगेश गवळी, चेतन मारवाल, श्याम रेडे, बंडू सवई, अमित भिरड, राजेश कानापुरे, अभिषेक मिश्रा, सुनील दुर्गिया, रामेश्वर पडुलकर, संजय पिल्लू आदींची उपस्थिती होती.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!