अकोला : पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांची हिंगोली येथे बदली झाल्यानंतर नवनियुक्त पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी शनीवार, 22 ऑक्टोबरला पदभार स्वीकारला.
2016 मध्ये आयपीएस प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर संदीप घुगे महाराष्ट्र पोलिस दलात दाखल झालेत. घुगे यांचे वडील भगवान घुगे हे शासकीय अधिकारी होते. त्यांचे बंधू अरविंद घुगे हे कस्टम विभागात आहेत. संदीप घुगे यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सेवा केली आहे. काेराेनाचा उद्रेक झाला असताना घुगे हे मालेगाव येथे कार्यरत होते. मालेगावचे अपर पाेलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या सह संपूर्ण पोलिस दल त्यावेळी 24 तास कार्यरत होते, कारण मालेगाव कोरोनाचा हॉटस्पॉट बनला होता. अशात घुगे यांनी सतत 10 दिवस घरी न जाता सेवा दिली. याच दरम्यान त्यांना मुलगा झाला. मात्र कर्तव्यावर असलेल्या घुगे यांनी बाळाचा आवाज फक्त फोनवर ऐकला आणि पुन्हा कोविड नियंत्रण मोहिमेवर लागले. अकोल्यात येण्यापूर्वी घुगे नवी मुंबई येथे एसआरपीएफचे समदेशक म्हणून कार्यरत होते.