Akola : सनातन संस्कृती महासंघाची बैठक गुरुवार ११ एप्रिल रोजी श्री रामदेवबाबा श्यामबाबा मंदिराचे सभागृहात संपन्न झाली. बैठकीत वर्तमान सामाजिक परिस्थितीवर विचारविमर्श करण्यात आला. संघटनेने केलेल्या कार्याची माहिती सचिव हेमंत जकाते यांनी दिली. समाजबांधवांशी जनसंपर्क वाढवण्यावर त्यांनी भर दिला. तरुण – तरुणींना नोकरी, व्यवसायाबाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जास्तीतजास्त सदस्य संघटनेत जोडून व्यवसायिक, समाजबांधवां च्या व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न करणार असल्याचे हेमंत जकाते यांनी सांगितले. ज्येष्ठ सदस्य जयंत इंगळे, बाळू चांदवडकर, गोवींद जोशी, निलेश जोशी, महेश शाह, मोहीत नायसे, युवराज राजगुरे, भावेश वाघमारे, धवल प्रजापत यांनी संघटना वाढीच्या दृष्टीने विचार व्यक्त केले.
अध्यक्ष ऋषिकेश जकाते यांनी संघटनेच्या कार्याचा प्रचार – प्रसार व्हावा यासाठी महानगरातील पुर्व-पश्चिम-उत्तर-दक्षिण तसेच मध्यभागात लवकरच प्रचारक नेमण्यात येणार असल्याची माहिती दिली. अमरावती व नागपूर येथे लवकरच संघटनेच्या शाखा सुरू करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. सुबोध देशमुख यांची संघटनेच्या वैद्यकीय संघप्रमुखपदी तर अमित अग्रवाल यांची कर्मचारी संघप्रमुखपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन कोषाध्यक्ष नरेंद्र कराळे यांनी तर आभार प्रदर्शन अमित अग्रवाल यांनी केले.बैठकीला हेमल खिलोसीया, देवाशिष बर्डे, रोहित दीपके, पंकज सिधारा, निशांत इंगळे, पियुष कनोजीया, सचिन जोशी गुरुजी, रोहन चंदन, मनोज अग्रवाल, मानसी अग्रवाल, ऋषभ खिलोसीया ( वाडेगाव), वीरवर्य जकाते, मल्हार इंगळे उपस्थित होते. बैठकीसाठी अभीजीत कराळे यांनी परिश्रम घेतले.