Home » Buldhana Crime : चिमुकल्यांचा वाद विकोपाला; 17 ग्रामस्थ जखमी

Buldhana Crime : चिमुकल्यांचा वाद विकोपाला; 17 ग्रामस्थ जखमी

Mehekar Tehesil : विठ्ठलवाडी गावाला पोलिस छावणीचे स्वरूप

by admin
0 comment

Vitthalwadi Village : होळी पेटविल्यानंतर चिमुकल्यांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीचे पर्यावरण गावातील दंगलीत झाले. या घटनेत 17 ग्रामस्थ जखमी झालेत. मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे ही घटना घडली. मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडी या गावात होळीचा वाद वाढत जाऊन तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गटांनी लाठ्याकाठ्यांनी एकमेकांवर हल्ले केले. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर झाली आहे. त्यांना बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दंगलीनंतर गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रविवारी (ता. 24) रात्री सुरू झालेला हा वाद दुसऱ्या दिवशीही पेटलेला होता.

डोणगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या विठ्ठलवाडी गावात संध्याकाळी लहान मुलांनी होळी पेटविली. डोणगाव पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या गावात संध्याकाळी लहान मुलांनी होळी पेटवली. त्यात हा प्रकार घडला. मुलांनी घरी जात हा आपापल्या पालकांना सांगितला. त्यामुळे गावातील लोकांमध्ये वादाला सुरुवात झाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. लाठ्याकाठ्यां व मिळेल त्या वस्तूनी हल्ले करण्यात आले. यातून महिलाही सुटल्या नाहीत. अनेक ग्रामस्थ जखमी झाल्यानंतर त्यांना मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त ताफ्यासह डोणगाव पोलिस विठ्ठलवाडीत दाखल झालेत. पोलिसांनी बळाचा वापर करीत वातावरण शांत केले. सध्या गावात दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. डोणगाव पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही गटातील दंगलखोरांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!