Crime News : क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या दोन ठिकाणांवर छापा घालत अकोला पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. तिघांकडून 1 लाख 68 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शंकर शेळके यांनी ही कारवाई केली. डाबकी रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील फुकटपुरा नेहरू नगर आणि बार्शीटाकळी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कान्हेरी सरप येथील हॉटेल राजवाडावर पोलिसांनी छापा घातला.
डाबकी रोडवरील फुकटपुरा नेहरूनगर येथे टॅबवरून सट्टा खेळण्यात येत होता. पोलिसांनी याप्रकरणी विवेक नंदलाल मुंदडा, दिनेश भुतडा, यश राजेश तिवारी, योगेश ओमप्रकाश अग्रवाल, रवींद्र मोतीराम दामोदर, अमेाल श्रीधर ठाकरे, प्रदीप सूर्यभान सोनटक्के, प्रविणसिंह राजपालसिंह चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कान्हेरी येथुन शेख रमजान शेख कालु गौरवे, वैभव पांडुरंग फेड याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गोपाल जाधव, फिरोज खान, भास्कर धोत्रे, खुशाल नेमाडे, रवी खंडारे, अविनाश पाचपोर, आकाश मानकर, धीरज वानखडे, अभिषेक पठाण, मोहम्मद आमीर यांनी ही कारवाई केली.