Home » Lok Sabha Election : नारायणराव गव्हाणकरांमुळे अनुप धोत्रेंना धोका

Lok Sabha Election : नारायणराव गव्हाणकरांमुळे अनुप धोत्रेंना धोका

Akola Constituency : घराणेशाहीचा आरोप करत केली बंडखोरी 

by नवस्वराज
0 comment

BJP Politics : माजी आमदार नारायणराव गव्हाणकरांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता तेही अकोला लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात राहतील. गव्हाणकरांनी भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्याविरोधात घराणेशाहीचा आरोप करत बंडखोरी केली. नारायण गव्हाणकर भाजप पक्षातून बाळापुरमधून 1995 आणि 2004 असे दोन टर्म आमदार राहिले आहेत.

गव्हाणकर भाजपचे माजी जिल्हाध्यक्षही राहिले आहेत. गव्हाणकर यांच्या अपक्ष उमेदवारीने भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांना कुठेतरी फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. भाजप त्यांची नाराजी कशाप्रकारे दूर करणार हे महत्वाचे ठरणार आहे. अनुप धोत्रे यांनी या संदर्भात बोलताना म्हटले की, आपण त्यांची नाराजी दूर करू. गव्हाणकर 2004 मध्ये लोकसभेसाठी सक्षम दावेदार होते. मात्र, तेव्हा त्यांना डावलून संजय धोत्रेंना उमेदवारी मिळाली. अकोला जिल्ह्यात कुणबी समाजाचे नेते म्हणून राजकारणावर गव्हाणकर यांची चांगली पकड आहे. भाजपच्या अंतर्गत राजकारणात संजय धोत्रे आणि डॉ. रणजीत पाटलांचे दोन गट तयार झाले आहेत. गव्हाणकर डॉ. रणजीत पाटील गटात असल्याचे बोलले जाते.

घटबाजी सांभाळावी लागणार

 

अकोला भाजपमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून गटबाजी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत ही गटबाजी भाजपला सांभाळावी लागणार आहे. यंदाच्या निवडणुकीत सध्या भाजपपुढे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी सोबतच स्वपक्षातील बंडखोर उमेदवाराचेही आव्हान आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांचे एकत्रीकरण व्हावे, यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न सुरू आहेत. हे एकत्रीकरण झाल्यास आणि नारायणराव गव्हाणकर यांची उमेदवारी कायम राहिल्यास धोत्रे यांच्या पुढील मार्ग खडतर होणार आहे. त्यामुळे भाजपला गटबाजीच्या या राजकारणात नाराज असलेल्यांची मनधरणी करावी लागणार आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!