Home » बुलडाण्यात ३० प्रवाशांसह बस नदीत कोसळली

बुलडाण्यात ३० प्रवाशांसह बस नदीत कोसळली

by नवस्वराज
0 comment

बुलडाणा : शेगाव येथुन पुण्याकडे निघालेली खासगी ट्रॅव्हल्सची बस पैनगंगा नदीच्या पात्रात कोसळली. या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून २५ प्रवासी जखमी झाले आहेत. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला.

या अपघातात एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. चिखली तालुक्यातील पेठ परिसरात ही घटना घडली आहे. या बसमधून अंदाजे ३० प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. ही भरधाव बस पुलावरुन तब्बल १५ फूट खोल दरीत कोसळली. मिळालेल्या माहितीनुसार, ही खासगी ट्रॅव्हल्स बस शेगाववरून पुण्याच्या दिशेने निघाली होती.

भरधाव बस चिखली रोडवरील पेठ जवळ आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस पैनगंगा नदीच्या पुलावरून खाली नदीच्या पात्रात कोसळली. जवळपास १५ फूट खोल नदीत ही बस कोसळली. अपघाताची माहिती मिळताच पेठ गावातील लोकांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावाधाव केली. बुलडाणा जिल्हा पोलिसांसह रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर जखमींना इस्पितळाकडे रवाना करण्यात आले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!