Home » Akola Police : गुन्ह्यांमध्ये लंपास केलेला मुद्देमाल नागरिकांना मिळाला परत

Akola Police : गुन्ह्यांमध्ये लंपास केलेला मुद्देमाल नागरिकांना मिळाला परत

IPS Bachan Sing : अकोला पोलिसांचे सहकार्य देण्याची ग्वाही

by नवस्वराज
0 comment

Crime News : अकोला जिल्हा पोलिस दलातील विविध पोलिस स्टेशनअंतर्गत दाखल गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला. मंगळवारी (ता. 20) पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या हस्ते राणी महल पोलीस लॉन येथे हा मुद्देमाल नागरिकांना परत करण्यात आला. एकूण सहा सोन्या-चांदीचे दागिने अंदाजे किंमत 10.76 लाख, 19 वाहने अंदाजे किंमत 16.64 लाख, मोबाइल फोन 149 अंदाजे किंमत 23.31 लाख, ऑनलाइन फसवणुकीच्या चार तक्रारीमधील अंदाजे किंमत 4.55 लाख व ईतर मुद्देमाल अंदाजे किंमत 1.12 लाख असा एकूण अंदाजे किंमत 56.5 लाखाचा मुद्देमाल तक्रारकर्त्यांना परत करण्यात आला.

बच्चन सिंह यावेळी म्हणाले की, भविष्यात आपल्याकडून काही चुका होणार नाहीत याकरीता खबरदारी घ्यावी. पोलिसांप्रती विश्वासपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी भविष्यात नागरिकांना मदत केली जाईल, असे ते म्हणाले. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास ताबडतोब पोलिस स्टेशनला संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी केले. ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. फसवणूक झाल्यास नागरीकांनी तत्काळ नॅशनल क्राइम रिपोर्टिंग पोर्टल (NCRP) आणि मोबाइल हरविल्यास सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजीस्टर (CEIR) पोर्टलवर ऑनलाइन तक्रार दाखल करावी, असे ते म्हणाले.

नीलेश राठी यांनी यावेळी मुद्देमाल परत मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे पोलिसांप्रति विश्वासाची भावना तयार झाली आहे, असे ते म्हणाले. सुरेश तोता यानी त्यांचा मोबाईल 14 दिवसांत परत मिळाल्याबद्दल आभार मानले. धनराज काळे यांनी पोलिसांच्या सहकार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाला अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, शहर पोलिस उपअधीक्षक सतीष कुळकर्णी, गुन्हे शाखेचे निरीक्षक शंकर शेळके आदी उपस्थित होते. पोलिस जवान गोपाल मुकुंदे, बिनतारी संदेश विभागाचे योगेश संखे, राखीव पोलीस निरीक्षक गणेश जुमनाके, सतीश फोकमारे, दत्तात्रय ढोरे, गणेश धुंपटवाड, कुंदन खराबे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!