Home » ‘प्रमाण’ आग्रहाचा धोका

‘प्रमाण’ आग्रहाचा धोका

by admin
0 comment

भाषेच्या शुद्ध-अशुद्धपणाचे गारुड आपल्या मनावर अनेक वर्षे आहे. प्रमाण म्हणजेच शुद्ध, असे आपले समीकरण असते. जे शुद्ध ते घ्यावे, अशुद्ध ते टाकून द्यावे, हा मानवी जगण्यातील प्रचलित समज आपण बोलल्या जाणाऱ्या भाषांनाही लावला आणि ‘अशुद्ध’ भाषा टाकायला लागलो. एवढेच नव्हे, तर त्या भाषा बोलणाऱ्या लोकांनाही आपल्या आयुष्यात उणे स्थान देत गेलो. खरे तर मानवी जगण्यात शुद्ध-अशुद्ध असे काळ्या पांढऱ्यासारखे काही नसते. भाषेच्या बाबतीत तर डावे उजवेपणाही नसतो. सर्वच भाषा स्वतंत्र आहेत, वैशिष्ट्यपूर्ण आहेत; तरीही हे शुद्ध-अशुद्धसारखे चुकीचे नियम आपण बोलण्याच्या भाषेलाही लावले आहेत.

error: Content is protected !!