Akola : संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने चैत्र शुक्ल प्रतिपदा गुढीपाडवा मंगळवार ०९ एप्रिल २०२४ रोजी हिंदू नवीन वर्षाचे स्वागत करण्याकरिता, नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हॉटेल ग्रीनलँड कॉटेज येथे आयोजित पत्रकार परिषदेत संस्कृती संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रा.नितीन बाठे, माजी अध्यक्ष डॉ. आर बी हेडा, कार्याध्यक्ष हरीष आलीमचंदानी यांनी याबाबत विस्तृत माहिती दिली.
स्वागत यात्रेचा प्रारंभ राजेश्वर मंदिरातून ०९ एप्रिल रोजी सकाळी ०७.०० वाजता महापूजेने होईल. स्वागत यात्रा काळा मारोती, सिटी कोतवाली, मोठे राम मंदिर मार्गे जुना कपडा बाजार, जैन मंदिर, गांधी चौक, तहसील ऑफिस, श्री.राणी सती मंदिर, श्री. गुरुद्वारा प्रबंधक समिति, मार्गे अशोक वाटिका येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात येईल. मदनलाल धिंग्रा चौकातून टावर चौक, रतनलाल प्लॉट, नेकलेस रोड मार्गे सिव्हिल लाइन चौकातून जवाहर नगर चौक, १२ ज्योतिर्लिंग मंदिर, राऊत वाडी मार्गे जठारपेठ, सातव चौक, बिर्ला ले आऊट मधील जलाराम मंदिर मार्गक्रमण करत, समारोप बिर्ला राम मंदिर येथे महाआरतीने होईल. बिर्ला राममंदिरात रामरक्षा पठण होणार आहे. स्वागत यात्रेतील मार्गात येणार्या सर्व मंदिरांना ध्वज प्रदान करण्यात येईल. लवकरच लोकसभा निवडणूक होणार आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर स्वागत यात्रेत मतदाना बाबत जनजागृती करण्यात येणार आहे. यात्रेत प्रभू श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण, हनुमान यांचा राम दरबार विशेष आकर्षण राहणार आहे.
नववर्ष स्वागत यात्रेत अकोल्यातील सर्व राष्ट्रप्रेमी बंधु भगिनींनी सहपरिवार उपस्थित राहावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष प्रा. नितीन बाठे, कार्याध्यक्ष हरिष आलीमचंदानी, स्वागताध्यक्ष पूरुषोत्तम मालाणी, स्वागत समितीचे उपाध्यक्ष नीलेश देव, निकेश गुप्ता, नंदकिशोर आवारे, अभय बिजवे, विनोद देव, मनीष चंदानी, अशोक पाध्ये, आनंद बांगड, समितीचे संयोजक विनोद जकाते, सह संयोजक स्वानंद कोंडोलीकर, राम भिरड, महिला संयोजिका सोनल ठक्कर, मीनाक्षी आपोतीकर, रश्मी कायंदे, कोषाध्यक्ष शरद वाघ, प्रचार प्रमुख समीर थोडगे यांनी केले आहे.
आयोजित पत्रकार परिषदेला संस्कृती संवर्धन समितीचे मार्गदर्शक मंडळ, अकोला विभाग संघचालक नरेंद्र देशपांडे, अकोला नगराचे संघचालक गोपाल खंडेलवाल, महेश जोशी, मोतीसिंह मोहता, हेमेंद्र राजगुरू, इंद्राणी देशमुख, संस्कार भारतीचे सुधाकर अंबुसकर, निनाद कुळकर्णी, चंदा जयस्वाल, आशा खोकले, चित्रा बापट, अर्चना शर्मा, अतुल आखरे, प्रशांत पाटील, अभिजीत भाटवडेकर, खेमराज भटकर, रूपेश वाखारकर, कृष्णा शर्मा, पंकज सादराणी, वैष्णवी देशमुख, रविंद्र देशमुख, पंकज सहगल, हर्षल पातूरकर उपस्थित होते.