Home » Maoists Arrest : सहा लाखाचे असलेल्या जहाल माओवाद्यास गडचिरोलीत अटक

Maoists Arrest : सहा लाखाचे असलेल्या जहाल माओवाद्यास गडचिरोलीत अटक

Gadchiroli police : अनेक घात कारवायांमध्ये सहभाग असलेली महिला अखेर पोलिसांच्या जाळ्यात

by अभिजीत कराळे
0 comment

Gadchiroli :  फेब्रुवारी ते मे महिन्यादरम्यान माओवादी टीसीओसी महिना साजरा करतात. यादरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे असे देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीत गडचिरोली पोलिस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका जहाल महिला माओवाद्यास काल अटक केली आहे. राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा (वय 30, रा. बडा काकलेर, तहसील भोपालपट्टनम, जि. बिजापूर (छत्तीसगड) असे अटक करण्यात आलेल्या महिला माओवादीचे नाव आहे.

मौजा केडमारा जंगल परिसरात झालेल्या पोलिस माओवादी चकमकीच्या अनुषंगाने भामरागड पोलिस ठाण्यात  दाखल गुन्ह्यात ती पोलिसांना हवी होती. गडचिरोली पोलिस दलाने विशेष अभियान राबवून तिला अटक केली. मौजा केडमारा येथे झालेल्या चकमकीमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.  या चकमकीत तीन माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिस दलास यश आले होते. छत्तीसगडमधील बिजापूर जिल्हा येथील कचलाराम जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये देखील तिचा प्रत्यक्ष सहभाग होता. चकमकीच्या अनुषंगाने तोयनार पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात तिला अटक करण्यात आली होती.

सक्रिय सहभाग

राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा. 2006 मध्ये चेतना नाट्य मंचामध्ये सदस्य पदावर भरती झाली. 2010-11 मध्ये ती  चेतना नाट्य मंचामध्ये उपकमांडर झाली.  2016 मध्ये फरसेगड दलममध्ये तिची बदली करण्यात आली.  2019 पर्यंत ती दलमसदस्य पदावर होती. 2019 छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात असलेल्या तोयनार जंगलातील पोलिसांवर तिने हल्ला केला होता.  2020 मध्ये कारागृहातून सुटल्यानंतर राजेश्वरी आतापर्यंत टेलर टीम दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीमध्ये ती एरीया कमिटी मेंबर पदावर कार्यरत होती.

शासनाने जाहीर केले बक्षीस

महाराष्ट्र सरकारने राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा हिच्या अटकेवर सहा लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते. तिला पकडण्यासाठी पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) एम. रमेश यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!