Home » Naxal Operation : महाराष्ट्र-छत्तीसगड सिमेवरील माओवादी कॅम्प उद्ध्वस्त

Naxal Operation : महाराष्ट्र-छत्तीसगड सिमेवरील माओवादी कॅम्प उद्ध्वस्त

Gadchiroli Police : मोठ्या प्रमाणावर साहित्य केले जप्त

by नवस्वराज
0 comment

Chutintola Village : निवडणुकीत हिंसक कारवाया करण्याच्या तयारीत असलेल्या माओवाद्यांचा कॅम्प पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. कसनसूर चातगाव दलम आणि छत्तीसगडच्या औंधी दलमचे काही सशस्त्र माओवादी या कॅम्पमध्ये मुक्कामी होते. छत्तीसगडमधील मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमावर्ती भागातील चुटीनटोला गावाजवळ माओवाद्यांनी तळ ठोकला होता. पेंढरी उपपोलिस स्टेशनपासून पूर्वेला 12 किलोमीटरवर हा कॅम्प होता.

अपर पोलीस अधीक्षक (अभियान) देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विशेष अभियान पथकाच्या जवानांनी जंगल परिसरात शोध मोहिम सुरू केली. अभियान पथक 450 मीटर उंच टेकडीवर पोहोचले. त्यावेळी माओवादी या ठिकाणाहून निघाले होते. डोंगर माथ्यावरील ठिकाणावर शोध मोहीम राबविण्यात आली. त्यावेळी डोंगरावर माओवाद्यांचे एक मोठा आश्रयस्थान आणि छावणी आढळली. ही छावणी अभियान पथकाने नष्ट केली. जंगल परिसरात शोध सुरू करण्यात आली आहे. परंतु हा प्रदेश अत्यंत खडतर आणि पर्वतांचा असल्याने दुर्गम भागाचा फायदा घेत माओवादी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झालेत.

टीनटोला गावाजवळ पोलिसांना कॉर्डेक्स वायर, डिटोनेटर्स, जिलेटिन कांड्या, बॅटरी, वॉकी टॉकी चार्जर, बॅकपॅक, माओवादी साहित्य इत्यादींचा मोठ्या प्रमाणात आढळले. विशेष अभियान पथके सर्व साहित्यासह गडचिरोली मुख्यालयात सुखरूप पोहोचले आहेत. छत्तीसगड सीमेवर माओवादविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गडचिरोली पोलिसांनी आंतरराज्य सीमेवर माओवाद्यांची चांगलीच नाकाबंदी केली आहे. त्यामुळे माओवादी चवताळले आहेत. वर्षभरात राबविण्यात आलेल्या अनेक मोहिमेत पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर माओवाद्यांचा खात्माही केला आहे. त्यामुळे या चळवळीला मोठा हादराही बसला आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!