Home » Hate Speech : ब्राह्मण समाजाला संपविण्याचे वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीविरोधात अकोला पोलिसात तक्रार

Hate Speech : ब्राह्मण समाजाला संपविण्याचे वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीविरोधात अकोला पोलिसात तक्रार

Akola Police : उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलही आक्षेपार्ह विधान 

by नवस्वराज
0 comment

Akola : राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या तसेच समस्त ब्राह्मण समाजाला फक्त तीन मिनिटात संपवू असे वक्तव्य करणारा व्हिडीओ युट्युब चॅनेलच्या माध्यमातून 26 फेब्रुवारी रोजी प्रसारित करण्यात आला. व्हिडीओवर वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीचे नाव योगेश सावंत (रा. बारामती) असून तो राष्ट्रवादी कॉंग्रेसचा (शरद पवार) सोशल मीडिया सेलचा उपाध्यक्ष आहे. योगेश सावंत हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचा कार्यकर्ता असल्याची पुष्टी पक्षाच्या एका आमदाराने केली आहे.

योगेश सावंत यांच्या समस्त ब्राह्मण समाजाला संपवण्याच्या वक्तव्यामुळे ब्राह्मण समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्राह्मण समाजाची कुठलीही चूक नसताना समाजाबद्दल विनाकारण गैरसमज पसरवून लक्ष्य करण्यात येत आहे. योगेश सावंत याची कृती सामाजिक तेढ निर्माण करणारी आहे. सावंत याच्या धमकीमुळे ब्राह्मण समाज दडपणाखाली आला असून त्यांच्या भावना दुखावल्या आहेत.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्यावतीने सकल ब्राह्मण समाजातर्फे युट्युब चॅनलवर ब्राह्मण समाजाला संपविण्याचे चिथावणीखोर वक्तव्य करणारा योगेश सावंत तसेच या षडयंत्रात सामील असलेल्यांवर गुन्हा नोंदवून कारवाई करावी, अशी तक्रार अकोला जिल्हा पोलिस अधीक्षकांना 27 फेब्रुवारी रोजी देण्यात आली. यावेळी ब्राह्मण समाजाचे उदय महा, कुशल सेनाड, विजय तिवारी, मोहन पांड्ये, निनाद आठवले, डॉ. ह.श. महाशब्दे, डॉ. सुभाष देशपांडे, डॉ. पार्थसार्थी शुक्ल, नीलेश देव, गिरीश गोखले, कपिल रावदेव, राजेश मिश्रा, राकेश रावल, अश्विन पांडे आदी उपस्थित होते. या घटनेचे पडसाद राज्याच्या विधानसभेतही उमटले आहेत. शिवसैनिक अक्षय पानवलकर यांच्या तक्रारीवरून योगेश सावंत तसेच व्हिडीओ अपलोडींग तसेच व्हायरल करणारा अश्या एकूण तिघांना सांताक्रुझ पोलिसांनी अटक केली असून, वांद्रे येथील न्यायालयाने 14 दिवसांसाठी त्यांची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!