Sindkhedraja :विविध मागण्यांकडे शासन, प्रशासन करीत असलेल्या अक्षम्य दुर्लक्षाच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. 29) तळपत्या उन्हात सिंदखेडराजा तहसिल ते उपविभागीय कार्यालय दरम्यान लोटांगण आंदोलन केले. कैलास नारायण मेहेत्रे यांच्यासह महिला, पुरुष शेतकरी, विविध योजनांचे लाभार्थी या आंदोनात सहभागी झाले.
नगरपरिषदेच्या पंतप्रधान आवास योजनेचा चौथा प्रलंबित हफ्ता देण्यात यावा, दुष्काळ ग्रस्त सिंदखेडराजा तालुक्यात सुरू असलेली बँकांची सक्तीची कर्ज वसुली थांबवावी, शेतकऱ्यांचे बँक खाते ‘होल्ड’ करू नये, सरसकट कर्ज माफी, रब्बी हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ द्यावी, शेड नेट धारकांना २ लाखांची मदत करावी, वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नासाडीची भरपाई, शेतीला कुंपण योजनेची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी लोटांगण घालण्यात आले.