Home » Buldhana Ravikant Tupkar : रविकांत तुपकर यांची अटक चुकीची ठरवत मुक्तता

Buldhana Ravikant Tupkar : रविकांत तुपकर यांची अटक चुकीची ठरवत मुक्तता

by नवस्वराज
0 comment

Buldhana | बुलढाणा : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांनी केलेली अटक अयोग्य ठरवत न्यायालयानं त्यांनी शनिवारी (ता. 25) काही तासातच जामिनावर मुक्तता केली. रविकांत तुपकर यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या पत्नी अॅड. शर्वरी तुपकर यांनी बुलढाणा कोर्टापुढं युक्तीवाद केला. अॅड. शर्वरी यांचा युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयानं तुपकर यांची मुक्तता केली. (Farmer Leader Ravikant Tupkar Gets Bail By Buldhana Court Within Some Hours of Arrest)

बुलढाणा शहर पोलिसांनी कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या तुपकर यांना शनिवारी नोटीस बजावली होती. मंत्रालयाचा ताबा घेण्याचा इशारा तुपकर यांनी दिला होता. आंदोलनावर ठाम असल्याने तुपकर यांना नोटीस बजावताच काही तासात अटक करण्यात आली होती. अटकेच्या कारवाईनंतर तुपकर समर्थक जिल्ह्यातील विविध ठिकाणी रस्त्यांवर उतरले. त्यांनी टायर जाळत रास्ता रोको आंदोलन केलं. बुलढाणा शहर पोलिस ठाण्यापुढंही कार्यकर्त्यांनी ठिय्या दिला. या आंदोलनादरम्यान नितीन राजपूत नावाच्या एका समर्थकानं पोलिस ठाण्यासमोरच गळफास घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं खळबळ उडाली.

काही तासातच बुलढाणा शहर पोलिसांनी तुपकर यांना कोर्टापुढं हजर केलं. सरकारी वकिल आणि बचाव पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टानं पोलिसांनी केलेली कारवाई चुकीची असल्याचं नमूद करीत तुपकर यांना जामिन मंजूर केला. त्यामुळं पोलिसांनी त्यांना मुक्त केलं.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!