New Delhi : अरविंद केजरीवाल तुरुंगात मिठाई, आंबे, साखर, बटाटे खात आहेत. त्यांना मधुमेहाचा त्रास आहे. तरीही त्यांची शुगर वाढावी म्हणून अरविंद केजरीवाल प्रयत्न करत आहेत. त्याद्वारे जामीन मिळवण्याचा प्रयत्न केजरीवाल करत आहेत असा आरोप ईडीने केला आहे. ईडीच्या आरोपानंतर ईडीने अरविंद केजरीवाल यांचा डाएट चार्ट मागवला आहे. अरविंद केजरीवाल यांना टाइप २ प्रकारचा मधुमेह आहे.
आप या पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मागच्या महिन्यात अटक करण्यात आली आहे. मद्य धोरण घोटाळा प्रकरणात ईडीने मागच्या महिन्यात ही कारवाई केली. अरविंद केजरीवाल हे तिहार तुरुंगात आहेत. या दरम्यान दिल्लीतल्या राऊज एव्हेन्यू कोर्टात अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान ईडीने त्यांच्यावर आरोप केले. अरविंद केजरीवाल जाणीवपूर्वक बटाटे, मिठाई, आंबे खात आहेत. जाणीवपूर्वक गोड पदार्थांचं सेवन करत आहेत. या सेवनामुळे त्यांची शुगर लेव्हल वाढेल आणि त्यांना जामीन मिळण्यास मदत होईल असा दावा ईडीने न्यायालयात केला आहे.
तुरुंग प्रशासनाने आम्हाला अरविंद केजरीवाल यांचा डाएट प्लान दिला आहे. त्यामध्ये केजरीवाल काय काय खातात याची माहिती आहे. आंबे, बटाटे, मिठाई हे गरजेपेक्षा जास्त खात आहेत हे सगळं ते मुद्दाम करत आहेत असाही आरोप ईडीने केला आहे. आता या प्रकरणी पुढच्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे.