Home » Buldhana Crime : पोलिसांच्या जाळ्यात अडकले ‘बंटी बबली’

Buldhana Crime : पोलिसांच्या जाळ्यात अडकले ‘बंटी बबली’

Couple Arrested : खामगावातील एकाला घातला होता गंडा

by नवस्वराज
0 comment

Khamgaon Police : ‘ऑनलाईन’ फसवणूक करणाऱ्या मध्यप्रदेशातील ‘बंटी- बबली’ला बुलढाणा सायबर पोलिसांनी गजाआड केले आहे. चंदा मनोज सोळंकी (४२, रा. इन्दूर) आणि तरुण पंकज खरे (रा. भोपाळ) अशी आरोपींची नावे आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील एकाची 2 लाख 4 हजार रुपयांची फसवणूक या दोघांनी केली होती.

खामगाव येथील दाल फैलमध्ये रहाणारे जय रवींद्र किलोलिया यांनी याप्रकरणी बुलढाणा सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. ‘जीमेल अपडेट’ करण्याच्या बहाण्याने एक फोन आला होता. सोबतच ‘व्हॉटस्अप’वर त्यांना एक लिंक टाकण्यात आली होती. त्याद्वारे आरोपींनी किलोलिया यांच्या ॲक्सीस बँकेच्या खात्यातून 2 लाख 4 हजार रुपये काढून घेत ऑनलाईन फसवणूक केली. 12 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली होती.

सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांनी तपास केला. तांत्रिक माहिती संकलित करण्यात आली. सायबर पोलिस ठाण्याचे सायरा शाह, शकील खान, कुणाल चव्हाण, राजदीप वानखडे, विक्की खरात, संदीप राऊत यांच्या पथकाने तपास केला. आरोपी चंदा मनोज सोळंकी, तरुण पंकज खरे यांना मध्य प्रदेशातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 2 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!