Home » Lok Sabha Election : काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या ‘वारे पंजा…’च्या घोषणा 

Lok Sabha Election : काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या ‘वारे पंजा…’च्या घोषणा 

Navneet Rana : कुठलीही प्रतीक्रिया न देता निघून गेल्या नवनीत राणा

by admin
0 comment

Amravati : लोकसभेची निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या जयंतीनिमित्‍त उमेदवारांनी प्रचाराची संधी साधली. यावेळी इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भाजपच्‍या उमेदवार नवनीत राणा पोहचल्‍या असता काही काँग्रेस कार्यकर्त्‍यांनी ‘वारे पंजा, आया पंजा’ अशा घोषणा दिल्‍या. त्यामुळे वातावरण काही काळ तापले होते.

शनिवारी मध्‍यरात्री नवनीत राणा यांनी आपल्‍या समर्थकांसोबत इर्विन चौकातील डॉ. आंबेडकर यांच्‍या पुतळ्याला पुष्‍पहार अर्पण केला. त्‍या चबुतऱ्यावरून खाली उतरत असताना काँग्रेसच्‍या काही कार्यकर्त्‍यांनी ‘वारे पंजा, आया पंजा’ अशी घोषणाबाजी केली. त्‍यावेळी नवनीत राणा यांनी कुठलीही प्रतिक्रिया देण्‍याचे टाळून तेथून निघून गेल्‍या.

या घोषणाबाजीची चित्रफित समाज माध्‍यमांवर चांगलीच गाजते आहे. अमरावती लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे हे नवनीत राणा यांच्‍या विरोधात लढत देत आहेत. चुरशीच्‍या या लढतीत कार्यकर्त्‍यांमध्‍ये संघर्ष पहायला मिळत आहे. गेल्‍या निवडणुकीत नवनीत राणा या काँग्रेस आणि राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या पाठिंब्‍यावर निवडून आल्‍या होत्‍या, परंतु यावेळी त्‍या विरोधात लढत आहेत. त्‍यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते त्‍यांच्‍या विरोधात बोलण्‍याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून येते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!