Home » Buldhana Crime : काडतूस व देशी पिस्तूलसह आरोपी ताब्यात

Buldhana Crime : काडतूस व देशी पिस्तूलसह आरोपी ताब्यात

Police Action : बुलढाणा येथे पोलिसांची मोठी कारवाई

by अभिजीत कराळे
0 comment

Buldhana : मध्य प्रदेश जवळील बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सोनाळा येथे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या पोलिस हद्दीत असलेल्या टुनकी बुद्रूक ते लाडणापूर मार्गाच्या केदार नदीजवळ पोलिसांच्या पथकाने एका युवकास ताब्यात घेतले असून त्याच्या जवळून एक जिवंत काडतूस, सहा देशी पिस्तूल आणि सात मॅगझीन जप्त केले आहेत.

चौकशीदरम्यान आरोपी दूसऱ्या राज्यातील रहीवासी असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीचे नाव वसीम खान इलियास खान ( वय 22, रा. सिंगार पुन्हाना, जिल्हा नुहू, हरयाणा) येथील रहीवासी आहे. आरोपीकडून जप्त करण्यात आलेले पिस्तुल, काडतुसे व मॅक्झीनची किंमत अंदाजे 1 लाख 80 हजार रुपये आहे. पोलिस अधीक्षक सुनिल कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील कर्मचारी विनोद शिंबरे, राहुल पवार, शेख इम्रान यांनी कारवाई केली. शस्त्र अधिनियम 1959 च्या कलम 3, 25 अन्वये आरोपी वसीम खान विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संग्रामपूर न्यायालयाने आरोपीची चार दिवसासाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!