Home » फडणवीस-शिंदे सरकारमध्ये अनेकांना मिळणार संधी

फडणवीस-शिंदे सरकारमध्ये अनेकांना मिळणार संधी

by नवस्वराज
0 comment

मुंबई  : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आता राज्यात फडणवीस-शिंदे यांचे सरकार लवकरच स्थापन होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. नव्या सरकारमध्ये पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांना भक्कम संधी भाजपाच्यावतीने नव्या मंत्रिमंडळात 28 ते 30 मंत्री भाजपचे असण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाला 12 ते 14 मंत्रिपदे देण्याबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री की एकनाथ शिंदे  राहणार यावर चर्चा सुरू आहे. मागील सरकारप्रमाणे गृह विभाग फडणवीस यांच्याकडेच राहु शकते.

भाजपकडून देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर, आशिष शेलार, प्रसाद लाड, रवींद्र चव्हाण यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, संभाजी पाटील निलंगेकर, राणा जगजीत सिंह पाटील, संजय कुटे, जयकुमार रावल, सुरेश खाडे, जयकुमार गोरे, देवयानी फरांदे, अशोक उईके, डॉ. परिणय फुके, रणधीर सावरकर यांची नावे आघाडीवर आहेत. जनसुराज्य शक्ती पक्षाकडून विनय कोरे आणि राम शिंदे यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा भाजपला पाठबळ देत आहेत, परंतु राणा यांना पत्नी खा. नवनीत राणा यांना केंद्रात मंत्रिपद मिळावे अशी ईच्छा आहे. त्यामुळे फडणवीस आणि भाजप त्यांच्या पदरात काय टाकणार याची प्रतीक्षा आहे. गोपीचंद पडळकर, प्रशांत ठाकूर, मदन येरावार, नितेश राणे, निलय नाईक, राहुल कुल यांनाही मंत्रिपद मिळू शकते असे सांगण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटातून उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, शंभुराज देसाई, बच्चू कडू, दीपक केसरक, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत यांना संधीची शक्यता आहे. संजय शिरसाट, भरत गोगावले, संदिपान भुमरे यांनाही संधी मिळू शकते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!