अमरावती : मुबंईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या नंतर आता पुढचा नंबर शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिवसेना नेते अनिल परब यांचा आहे, असे विधान अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यानंतर महाराष्ट्रात खूप नेत्यांचे नंबर येणार आहेत. मागच्या सहा-सात महिन्यातले दिवस पाहिल्यास अनिल परब यांची अनेकदा ईडीकडून चौकशी झाली आहे. अनिल परब यांनी दिलेली उत्तरही ईडीसाठी समाधानकारक नाहीत. त्यामुळे त्यांना पुन्हा पुन्हा चौकशीला बोलावले जात आहे. संजय राऊत यांचीही अनेकदा ईडीकडून चौकशी झाली आहे. त्यांना ईडीचे अनेकदा नोटीस येत आहेत. आता संजय पांडे जेलमध्ये गेले आहेत. त्यानंतर राऊत आणि परब यांचा आता नक्कीच नंबर लागणार आहे, असा इशाराच राणा यांनी देऊन टाकला आहे.