Home » अकोल्यात वाहतूक पोलिसांनी दिले एनसीसी विद्यार्थ्यांना धडे

अकोल्यात वाहतूक पोलिसांनी दिले एनसीसी विद्यार्थ्यांना धडे

by नवस्वराज
0 comment

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे सुरू असलेल्या एनसीसी वार्षिक प्रशिक्षण शिबिरामध्ये शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोलामार्फत वाहतूक नियंत्रण व वाहतूक नियम याबाबत विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांबाबत अवगत करून रस्त्यावर वाहतूक नियंत्रण कशी करण्यात येते, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. वाहतूक सिग्नलची ओळख करून देण्यात आली. रस्त्यावरून चालताना फूटपाथचा वापर करणे, रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंगचा वापर करणे, ड्रायव्हिंग लायसन्स असल्याशिवाय वाहन न चालविणे, ड्रायव्हिंग लायसन्स व वाहनाची इतर कागदपत्रे नेहमी सोबत बाळगणे, वाहने सुरक्षित ठिकाणी पार्किंग करणे बाबत योग्य दक्षता घेणे, मादक द्रव्याचे सेवन करून कोणत्याही प्रकारचे वाहन चालवू नये, वाहन चालवताना मोबाईल वर संभाषण करू नये आदी आवश्यक बाबींबाबत मार्गदर्शन करून एनसीसी विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत तसेच त्यांच्या संपर्कातील इतर लोकांनाही त्याबाबत अवगत करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पोलिस निरीक्षक विलास पाटील, सुधाकर डाबेराव, महिला पोलिस अंमलदार दीपाली नारनवरे व महिला पोलिस अंमलदार अश्विनी माने यांनी प्रशिक्षण दिले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!