Home » Lok Sabha Election : एकमेकांबद्दल बोलताना आजी-माजी आमदारांची जीभ घसरली

Lok Sabha Election : एकमेकांबद्दल बोलताना आजी-माजी आमदारांची जीभ घसरली

Buldhana Constituency : संजय गायकवाड, विजयराज शिंदे यांच्यात वाद वाढला

by admin
0 comment

BJP Vs Shiv Sena : बुलढाणा लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीत सर्वकाही ठिक नसल्याचे चित्र आहे. भारतीय जनता पार्टीचे लोकसभा प्रमुख  माजी आमदार विजयराज शिंदे आणि शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी एकमेकांबद्दल बोलताना भाषेच्या मर्यादा सोडल्याने येथील वाद विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत. विजयराज शिंदे यांनी मनधरणीनंतर लोकसभा निवडणुकीतील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. अर्ज मागे घेताच शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्याविरोधात वक्तव्य केले.

‘निवडणुकीनंतर तुला दाखवतो..’ अशी थेट धमकी आमदार गायकवाड यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे. भाजपाचे प्रचार प्रमुख माजी आमदार विजयराज शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज वरिष्ठांनी हस्तक्षेप केल्यामुळे मागे घेतला. यावर आमदार संजय गायकवाड आणि विजयराज शिंदे यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. शिंदे यांनी बोलताना ‘संजय गायकवाड जर एक बापाचे असते तर त्यांनी अर्ज कायम ठेवायला पाहिजे होता’ असा टोला लगावला. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ बुलढाण्यात सर्वत्र व्हायरल झाला आहे. त्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी लगेच पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली. आमदार संजय गायकवाड यांची जीभही घसरली.

‘माझे किती बाप आहे हे मी तुला प्रत्येक निवडणुकीत दाखविले आहे. राहिला विषय अर्ज भरायचा तर मला निवडणूक लढायचीच नव्हती. तो माझा ‘गेम प्लान’ होता आणि तो ‘सक्सेस’ झाला. जर तुला जास्त मस्ती आली असेल, तर एका बुक्कीत तोंड फुटलेले आहे. त्यानंतर तू कसा पळाला हे विसरला का?  ही निवडणूक होऊ दे मग तुला सांगतो’ अशा शब्दात गायकवाड यांनी शिंदे यांना खुली धमकी दिली. त्यामुळे हे दोघेही नेते आता प्रचारदरम्यान महायुती करता डोकेदुखी ठरू शकतात असे सांगण्यात येत आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!