Home » Chandrapur : ऑस्ट्रियाची युवती झाली चंद्रपूरची सून

Chandrapur : ऑस्ट्रियाची युवती झाली चंद्रपूरची सून

Marriage: देशांतील नागरिक वरातीला

by नवस्वराज
0 comment

Chandrapur : सावली तालुक्यातील दाबगाव मौशी येथील उच्चशिक्षित युवकाचा युरोपातील ऑस्ट्रिया देशातील युवतीशी प्रेमविवाहसोहळा नुकताच संपन्न झाला.

आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेले सुकरू पाटील आभारे यांचा एकुलता एक मुलगा हेमंत उच्च शिक्षित असून विदेशातील एका कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे. त्याचे ऑस्ट्रिया देशातील युडीश हरमायनी प्रित्झ, रा. बियेना ऑस्ट्रिया या युवतीशी प्रेमसंबंध जुळून आले. दरम्यान, दोघांनीही लग्न करण्याचे ठरवल्यानंतर त्यांनी थेट आपले गाव गाठले. आईवडिलांच्या परवानगीनंतर लग्नाची तारीख ठरविण्यात आली. मात्र, गावात समारंभ युक्त सभागृह नसल्याने थेट स्वतःच्या शेतातच लग्न करण्याचे ठरले. कोणताही मंडप किंवा बडेजाव न करता शेतातील एका झाडाखाली लग्नविधी सामाजिक रीतिरिवाजाप्रमाणे पार पाडण्यात आला. आधुनिक युगात नावीन्यपूर्ण आणि दिखाऊपणाचा बाज न आणता जुन्या पद्धतीच्या बैलबंडीने वाजतगाजत वरात काढण्यात आली. या समारंभाला अमेरिका, स्पेन, दक्षिण आफ्रिका, फिलिपीन्स, नेदरलॅन्ड, ऑस्ट्रियासह नऊ देशांतील वधूचे आप्तेष्ट उपस्थित होते.

युवतीला थेट गावात आणून बैलबंडीतून वरात काढत अतिशय साध्या पद्धतीने विवाह संपन्न झाला. या आगळ्या वेगळ्या  प्रेमविवाह सोहळ्याची जिल्ह्यातभरात चर्चा होत असून चित्रफित समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, या विवाह सोहळ्याला अमेरिका, स्पेन, दक्षिण आफ्रिका, फिलिपीन्स, नेदरलॅन्ड, ऑस्ट्रियासह नऊ देशांतील वधूचे आप्तेष्ट सहभागी झाले होते.

 

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!