Home » Buldhana Crime : मनसे जिल्हाध्यक्षासह चार पदाधिकाऱ्यांविरुद्ध खंडणीचा गुन्हा

Buldhana Crime : मनसे जिल्हाध्यक्षासह चार पदाधिकाऱ्यांविरुद्ध खंडणीचा गुन्हा

Extortion Money : व्यापाऱ्याकडे मागितली दोन लाखांची खंडणी

by नवस्वराज
0 comment

Police Action : एका व्यापाऱ्याला मारहाण करून व धमकावून दोन लाखांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून बुलढाणा मनसे जिल्हाध्यक्षासह चार पदाधिकाऱ्यांविरुद्ध खंडणी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चिखली येथे ही घटना घडली.

आरोपींमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर यासह 10 ते 15 जणांचा समावेश आहे. चिखली ‘एमआयडीसी’ मधील तिरुपती जिनिंग व प्रेसिंग चे मालक गोविंद अग्रवाल यांना दमदाटी करून २ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप सर्वांवर आहे. मनसे पदाधिकारी व अन्य अनोळखी सुमारे 15 जणांनी धक्काबुक्की करून हात पाय तोडण्याची धमकी दिली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!