अमरावती : हनुमान जयंतीच्या पर्वावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.
माझी काय चूक होती? राज्यावरचं संकट दूर व्हाव, म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसेचं पठण करावं एवढीच विनंती मी केली होती. मात्र तेव्हा आम्हाला १४ दिवस तुरुंगात डांबण्यात आलं. पोलीस स्टेशनमध्ये बारा तास उभ ठेवलं, तुरुंगात पाणी सुद्धा दिलं नाही, मुलं विचारायचे आई तु काय गुन्हा केलास? असं राणा यांनी म्हटलंय.
पुन्हा एकदा हनुमान चालीसावरून नवनीत राणा यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे स्व:ताचा पक्ष सांभाळू शकले नाहीत, पक्षाची विचारधारा सांभाळू शकले नाहीत, आज बाळासाहेब ठाकरे देखील आश्रू ढाळत असतील असा जोरदार टोला नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. जिथे जिथे मविआची सभा होईल, तिथे-तिथे हनुमान चालीसाचं पठण करणार असल्याचा निर्धार देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.