मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दोघांनाही आपल्या पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. राज भावनात पार पडलेल्या या सोहळ्याला केंद्रीय मंत्री भागवत कराड, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे आदी उपस्थित होते.
एकनाथ शिंदे शपथ घेण्यासाठी राजभवन सभागृहाच्या मंचावर आले तेव्हा शिंदे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या. एकनाथ शिंदे यांनी देखील मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या नावाचा उल्लेख केला. शिंदे यांच्या शपथविधीनंतर फडणवीस यांनी उपमुख्यमंतत्रिपदाची शपथ घेतली.