Water Shortage : दूषित पाणी पिल्याने गेल्या महिन्याभरात दोन महिलांचा मृत्यू झाला. बार्शीटाकळी तालुक्यातील निंबी खुर्द गावात हा प्रकार घडला आहे. विहिरीचे दूषित पाणी पिण्यात आल्यामुळे दोन महिलांचा मृत्यू झाला, असा आरोप मृतांच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी देखील केला.
Vanchit Bahujan Aghadi : इंडिया आघाडी आता जवळपास संपल्यात जमा
विहिरीतल्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी बळीराम गाढवे यांनी सांगितले. गावात सध्या एकही रुग्ण किंवा साथ नाही असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. अहवाल आल्यानंतर संबंधित दोन महिलांचा मृत्यू दूषित पाण्यामुळे झाला की नाही, हे स्पष्ट होणार आहे. निंबी खुर्द येथील 19 वर्षीय कुमारी प्रतीक्षा किशोर शिवणकार हिला मळमळ, उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान प्रतिक्षाची प्रकृती अचानक खालावली आणि तिचा मृत्यू झाला. गावातील सरस्वताबाई जनार्दन गावंडे यांचे पोट दुखत होते. त्यांनाही उलट्या आणि मळमळ होऊ लागल्याने एका खासगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु त्यांचाही मृत्यू झाला. निंबी गावात सरकारी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित नाही. सध्या गावकरी स्वतंत्र विहिरीचे पाणी पित आहेत. गेल्या चार ते पाच महिन्यापासून या पाण्यामुळे अनेकांना आजार होत असल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे.