Home » Lok Sabha Election 2024 : शिवसेना, प्रहारला अकोला भाजपकडून खिंडार

Lok Sabha Election 2024 : शिवसेना, प्रहारला अकोला भाजपकडून खिंडार

Akola Politics : अकोट तालुक्यातील 500 कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

0 comment

Akola News : भाजपने  शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि प्रहार जनशक्ती पार्टीला अकोला जिल्ह्यात खिंडार पाडले आहे. अकोट तालुक्यातील ठाकरे सेना आणि प्रहार संघटनेच्या पाचशे कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करीत खासदार संजय धोत्रे, प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, किशोर पाटील, जयंत मसने यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे.

आगामी लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला त्यामुळे बळ प्राप्त होणार आहे. महायुतीचा झेंडा फडकविण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांचा हा प्रवेश महत्वाचा मानला जात आहे. दिवसरात्र नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करीत देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एकेरी भाषेत बोलणाऱ्यांना ही जबर चपराक आहे. निवडणुकीच्या काळात मतदार अशांना योग्य जागा दाखवेल, असे भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी नमूद केले. भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणाऱ्यांचे त्यांनी स्वागत केले.

मंचावर जिल्हा भाजपाध्यक्ष किशोर मांगटे पाटील, जयंत मसने, अनुप धोत्रे, विजय अग्रवाल, राजेश रावणकर, राजेश नागमते, प्रवीण डिक्कर, माधव मानकर, देवाशिष काकड, संजय गोटफोडे, उमेश पवार, अकोट पंचायत समितीचे उपसभापती संतोष शिवरकर, तेजराव थोरात, विठ्ठल वाकोडे, अंबादास उमाळे, कुसुम भगत, दत्तू पाटील, विवेक भरणे, मधुकर पाटकर आदी उपस्थित होते. यावेळी किशोर पाटील, अनुप धोत्रे, राजेश रावणकर, उमेश पवार यांची समायोचित भाषणे झालीत.

प्रहारचे सागर उकांडे, किशोर देशमुख, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे गजानन काळमेघ, शंतनु गावंडे, सर्वेश देठे, रोहित ताकोले, अभी गायकवाड, विक्रांत रोठे, अजय ठोकळ, राम वाघ, हृषी भुरे, भूषण झापर्डे, नागेश शिरसाट, तुषार चांदूरकर, अश्विन बागडे, सुशील तायडे, शशांक गिते, सुनील बोरकुटे, मयूर हिंगणकर, शुभम भटकर, विशाल सेरोकर, सोपान वानखेडे, विलास कळमेघ, अक्षय बोंकर, गोपाळ वसू, श्रीकांत वानखेडे, विवेक बोर्थे, धनंजय काळमेघ, पंकज वानखडे, शिवशंकर वानखडे, शिवा पोहरे, गौरव ढोणे, शरद वानखडे, अभिजित महादेव, निशांत वानखडे, निशांत लोखंडे, पंकज वानखडे, श्रीकांत वानखडे, संदीप सातारकर, गौरव गव्हाणे, वैभव हनुमंते, मुकुंद बडासे, गोपाळ भगत, शाम साहरे, महेंद्र फरसुले, अक्षय गव्हाणे, मोहन तायडे, प्रकाश विंचाळे, ज्ञानेश्वर घोपे, सचिन शेगोकार, विनोद राऊत, सचिन भालतिलक, सदानंद जोध, राम तायडे, मनोज सरकटे, उल्हास हरणे, राहुल धोराले, गजानन सोळंके, गजानन जोध, दीपक रामधानी आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!