Modi In Pariksha Pe Charcha : परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी यांनी कोरोना काळात देशवासियांना थाळी वाजवण्याचे आवाहन का केले होते याचा खुलासा केला. या काळात मोदी यांनी लोकांना दिवे पेटवण्याचे ही आवाहन केले होते. 2020 मध्ये कोरोना महामारीने जगभरात थैमान घातले या काळात भारतात मोदींनी देशवासियांना आवाहन केले होते आता चार वर्षांनी यामागच्या कारणांचा त्यांनी खुलासा केला आहे.
प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधला. यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर, एआय अशा मुद्द्यांसह करोना काळातील व्यवस्थापनावरही मोदींनी भाष्य केले. करोना काळात भारतातील परिस्थितीचे नियोजन कसे केले? अशी विचारणा बिल गेट्स यांनी केली असता मोदींनी त्याच्या उत्तरादाखल त्यावेळी कोणत्या धोरणाने मार्गक्रमण केले ,याविषयी माहिती दिली.
पंतप्रधान म्हणाले की, कोरोनाच्या काळात मी देशवासीयांना टाळ्या-थाळ्या वाजवण्यास सांगितले. तथापि, ते कोरोनाचे उच्चाटन करत नाही तर सामूहिक शक्तीला जन्म देते. पूर्वी आमचे लोक खेळाच्या मैदानात जायचे. कधी काही विजयी होऊन परत येत, तर अनेक विजयी होत नसत.
मोदी पुढे म्हणाले, पूर्वी कोणी विचारत नव्हते, पण मी त्यासाठी ढोल वाजवणार असल्याचे सांगितले. जी काही शक्ती आहे, तिचा योग्य वापर केला पाहिजे. चांगले सरकार चालवायचे असेल तर समस्या सोडवण्यासाठी तळापासून योग्य माहिती आणि मार्गदर्शन आले पाहिजे.
टाळ्या, थाळी, दिवे याबाबत मी जनतेला आवाहन केले होते.आज या गोष्टीवर आमच्या देशात मस्करी केली जात आहे. पण मला लोकांना विश्वासात घ्यायचे होते की, आपल्याला ही लढाई एकत्र लढायची आहे. तेव्हा हा विश्वास निर्माण झाला की आपल्याला आपले आयुष्य वाचवताना इतरांचं आयुष्य वाचेल यासाठीही प्रयत्न करायचे आहेत. मग ती एक प्रकारे व्यापक चळवळ झाली. त्यामुळे नंतर मी देशवासीयांना जे काही सांगायचो, त्याचा स्वीकार व्हायचा. मला कुणी विचारायचे नाही की मास्क लावायला पाहिजे की नाही”, असे मोदीं म्हणाले
परीक्षेच्या तयारीबद्दल पंतप्रधान काय म्हणाले?
मोदी म्हणाले की परीक्षा देताना पेपर पाहताच विद्यार्थी तणावग्रस्त होतात. त्यांना पेपर पहिला मिळाला, की, वेळ पुरेल की नाही याचा विचार मुले करू लागतात, आधी कुठला प्रश्न सोडवावा याचा विचार करतात. पंतप्रधान म्हणाले की, मुलांनी प्रथम संपूर्ण पेपर वाचावा, त्यानंतर कोणत्या प्रश्नासाठी किती वेळ लागेल हे त्यांच्या मनात ठरवावे आणि त्यानुसार उत्तर लिहावे.
पंतप्रधानांनी शिक्षकांना काय सूचना दिल्या?
विद्यार्थ्यांसोबतच मोदींनी शिक्षकांनाही काही सूचना केल्या. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात एक बंधन असावे. त्यांच्यात मैत्रीचे नाते असणे महत्त्वाचे असल्याचे पंतप्रधान म्हणाले. शिक्षकाचे काम नोकरी बदलणे नाही तर विद्यार्थ्यांचे जीवन बदलणे आणि त्यांना चांगले. नागरिक बनवणे आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.