Home » Lok Sabha Election 2024 : संजय राऊत धादांत खोटारडे

Lok Sabha Election 2024 : संजय राऊत धादांत खोटारडे

Vanchit Bhaujan Aghadi : अमरावती येथे प्रकार आंबेडकर यांचे तीव्र टीकास्त्र

by नवस्वराज
0 comment

Amravati : महाविकास आघाडीत जागावाटपावरून भांडणे सुरू आहेत. यांचे मतभेद मिटलेले नाहीत. आघाडीत प्रचंड वाद असताना तीनही पक्ष एकत्र येणार का? असा प्रश्न असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी (ता. 12) येथे केली. अमरावती येथील येथील विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीतील जागावाटप अडल्‍याची चर्चा चुकीची असल्‍याचे सांगितले.

वंचित बहुजन आघाडीने आमच्‍याकडे जागाच मागितल्‍या नाहीत, असे खोटे वक्‍तव्‍य शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत करीत आहेत. महाविकास आघाडीत जागावाटपावरून भांडणे सुरू आहेत, असे आंबेडकर म्हणाले. महाविकास आघाडीत कॉंग्रेस आणि शिवसेनेत लोकसभेच्‍या दहा जागांवरून मतभेद आहेत. या दहा जागांवर कॉंग्रेस आणि शिवसेनेनेही दावा केला आहे. दुसरीकडे, पाच जागांवरून कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्‍ट्रवादी कॉंग्रेस यांच्‍यात अजून समझोता झालेला नाही. संजय राऊत हे माध्‍यमांशी खोटे बोलत आहेत. जेव्‍हा महाविकास आघाडीतील मतभेद संपुष्‍टात येतील, तेव्‍हाच वंचित बहुजन आघाडी चर्चा करू शकेल.

आपण स्‍वत: कॉंग्रेस पक्षाचे महाराष्‍ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्‍याशी दूरध्‍वनीवरून संपर्क साधला. महाविकास आघाडीतील जागावाटपाचे भिजत घोंगडे असताना आपण स्वत:हून हा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत महाविकास आघाडीतील तीन पक्षांतील जागा वाटपावर मतैक्‍य होत नाही, तोपर्यंत कॉंग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्‍यात जागावाटपाविषयी चर्चा सुरू करता येऊ शकेल, असा प्रस्‍ताव आपण दिला. मात्र काँग्रेसने अद्याप यावर कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. आपण स्‍वत: कॉंग्रेसचे अध्‍यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना पत्र पाठवले. त्‍यात कॉंग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्‍यात जागा वाटपाविषयी चर्चा व्‍हावी, अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली आहे, पण त्‍याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. आम्‍ही महाविकास आघाडीसोबत जाण्‍यास तयार आहोत, पण आधी त्‍यांच्‍यातील भांडणे मिटली पाहिजे, अशी अपेक्षाही आंबेडकर यांनी व्यक्त केली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!