मुंबई : महाराष्ट्रामध्ये सुरू असलेला सत्तासंघर्ष शिगेला पोचला आहे. अशात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून सीआरपीएफचे दोन हजार जवान विमानतळ ते विधान भवन परिसरापर्यंत तैनात करण्यात आले आहेत. पुणे, दिल्ली, गुजरातमधुन हे युनिट बोलाविण्यात आले आहेत.
एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर गुवाहाटी येथे मुक्कामी असलेले सर्व आमदार 30 जूनला मुंबईत परत येणार आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून हा उपाय करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना विरोध केला जातोय. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ज्यावेळी सर्व बंडखोर आमदार बसमधून मतदानासाठी विधान भावनाकडे जातील त्यावेळी कोणत्याही प्रकारचा हल्ला किंवा अडचण या आमदारांच्या वाटेला येऊ नये, ही खबरदारी घेण्याचे आदेश केंद्र सरकारने सीआरपीएफला दिले आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये आमदारांना पूर्णतः संरक्षण देण्याची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली आहे.