Home » Buldhana : धक्कादायकच!!! सासऱ्याने गर्भवती सुन, नातवाला संपविले; चिखलीत अत्याचारानंतर खून

Buldhana : धक्कादायकच!!! सासऱ्याने गर्भवती सुन, नातवाला संपविले; चिखलीत अत्याचारानंतर खून

Crime Incident : कुटुंबातील वादाची किनार; दुसऱ्या घटनेत ढाब्याजवळ मृतदेह आढळला

by नवस्वराज
0 comment

Sangrampur : बुलढाणा जिल्हा तीन खुनांच्या घटनेमुळे मंगळवारी (ता. 23) चांगलाच हादरला. संग्रामपूर येथे कुटुंबातील वादातून सासऱ्याने गर्भवती सून आणि नातवाची हत्या केली. दुसऱ्या घटनेत चिखलीजवळ अत्याचारानंतर तरुणीचा खून करून विवस्त्र मृतदेह जाळण्यात आला. दोन्ही घटनांचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवानंद गायकी आणि गणेश गायकी यांचे कुटुंब बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे राहाते. नारायण गायकी (वय 65) त्यांचे वडिल. देवानंद आणि गणेश दोघेही विवाहित आहेत. देवानंदला दहा वर्षांचा मुलगा आहे. समर्थ हे त्याचे नाव. सून आश्विनी देवानंद गायकी ही गरोदर होती. मंगळवारी घरात कोणी नसल्याचे पाहून नारायणने नातू समर्थ व लहान सून अश्विनी यांच्यावर कुऱ्हाडीने वार केला. हल्ल्यात समर्थ जागीच ठार झाला. धाकटी सून अश्विनी गंभीर जखमी झाली.

अश्विनीला उपचारासाठी तातडीने शेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार मिळण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. माहिती मिळताच तामगाव पोलिस घटनास्थळी दाखल झालेत. पोलिसांनी आरोपी सासरा नारायण गायकीला अटक केली.

आरोपीची दोन्ही मुले घटना घडली त्यावेळी गावाबाहेर गेली होती. पत्नी निरोड शिवरा येथे शेतात काम करण्यासाठी गेली होती. ही घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली, याबाबत ठाम माहिती मिळाली नाही. प्राथमिक तपासात घरगुती वादातून हत्या झाली असावी असा अंदाज आहे. प्रकरणाचा तपास ठाणेदार सुरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक दीपक सोळंके करीत आहेत.

अत्याचार, गळा आवळला, दगड घातला, मग जाळले

चिखली तालुक्यातील असोला शिवारात मंगळवारी एका तरुणीचा विवस्त्रावस्थेत मृतदेह आढळला. चिखली ते अंचरवाडीदरम्यान असोला गावाजवळील एका ढाब्याच्या मागील बाजूस हा मृतदेह विवस्त्र व अर्धवट जळालेल्या अवस्थेत होता. तरुणीचे वय 19 ते 25 असल्याचा अंदाज आहे. तरुणीचा आधी गळा आवळण्यात आला. त्यानंतर डोक्यावर मागील बाजूला दगडाने वार करण्यात आला. अंगातील कपडे तिच्या चेहऱ्यावर टाकून जाळण्यात आले. हत्येपूर्वी तरुणीवर अत्याचार झाला असावा, असा संशय पोलिसांना आहे. तिची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

Buldhana Ravikant Tupkar : रविकांत तुपकर यांची अटक चुकीची ठरवत मुक्तता

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!