Home » आता तृतीयपंथीही होऊ शकतील पीएसआय

आता तृतीयपंथीही होऊ शकतील पीएसआय

by नवस्वराज
0 comment

नागपूर : तृतीयपंथीयांचा पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनाने सेवाप्रवेशात त्यांच्यासाठी निकष निश्चित केले आहेत. गृह विभागाकडून सेवाप्रवेश नियमात सुधारणा केली आहे. त्यामुळे या वर्गासाठी लढणाऱ्यांना मोठे यश प्राप्त झाले आहे.

शासकीय सेवेत भरतीसाठी महिला व पुरुष अशा दोन वर्ग होते. त्यामुळे तृतीय पंथींना शासकीय सेवेत प्रवेशासाठी मोठी अडचण ठरत होती. आता शासनाने तृतीय पंथींना पोलिस सेवेत घेण्याचाही निर्णय घेतला आहे. अर्ज प्रक्रियेत तशी सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तृथीय पंथींमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु त्यांच्यासाठी निकष निश्चित करण्यात आले नसल्याने प्रत्यक्ष भरतीप्रक्रिया राबवण्यास अडचण येत होती. आता ही अडचणही दूर करण्यात आली आहे. २२ जून रोजी गृह विभागाकडून याबाबतचे आदेश काढण्यात आलेत.

निकष पूर्ण करणाऱ्यास सेवेत संधी मिळणार आहे. या निकृषानुसार तृतीय पंथींना पुरुष, स्त्री किंवा तृतीय पंथी अशी ओखळ निश्चित करावी लागणार आहे.तृतीय पंथी म्हणून ओळख दाखवल्यास त्यांना शारीरिक चाचणीत सूट मिळेल. उंचीसाठी महिला वर्गाप्रमाणे १५७ सेंटीमीटरचे निकष लागू होतील. पुरुष म्हणून ओळख दाखवल्यास त्यांना पुरुषांप्रमाणे उंचीकरिता १६५ सेंटीमीटरचे निकष लागू होतील. तृतीय पंथींनी स्वतःची ओखळ पुरुष दाखवली तरी शारीरिक चाचणीत छातीचे निकष महिलांप्रमाणेच असणार आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!