Nagpur : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. देशात सात टप्प्यांमध्ये तर महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे. 19 एप्रिलपासून देशात लोकसभा निवडणूक होणार असून 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मधील पहिल्या टप्प्यासाठी बुधवारी (ता. 20) नागपूर विभागातील पाच लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक अधिसूचना जारी झाली. नामनिर्देशपत्र भरण्यासही सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये एक नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहे.
20 मार्च ते 27 मार्च उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कालावधीमध्ये तीन दिवस प्रशासनिक सुटी आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना पाचच दिवस मिळणार आहेत. 30 मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. 4 जून रोजी मतमोजणीनंतर निकाल जाहीर होणार आहे. 6 जूनपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू राहणार आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात नामांकन अर्ज दाखल करण्यास येणाऱ्या उमेदवारांपैकी व्यंकटेश्वरा महाराज स्वामी यांनी भारतीय जनता पार्टीच्यावतीने नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.
#WATCH नागपुर: लोकसभा चुनाव पर केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा ने कहा, "मैं आदिलाबाद निर्वाचन क्षेत्र से आ रहा हूं और पार्टी कार्यकर्ताओं और समर्थकों के बीच उत्साह है… भाजपा ने आगामी लोकसभा चुनावों के लिए कई स्थानों पर उम्मीदवारों की घोषणा कर दी है, और अन्य की घोषणा जल्द होगी।" pic.twitter.com/1fMfzpVxCF
— ANI_HindiNews (@AHindinews) March 20, 2024
पहिल्याच दिवशी नागपुरात गडकरींवर प्रेम असणाऱ्या एका आगळ्यावेगळ्या उमेदवाराने त्याचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. व्यंकटेश्वरा स्वामी महाराज हेच त्या उमेदवाराचे नाव आहे. व्यंकटेश मूळचे कर्नाटक मधील असून सध्या महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात वास्तव्यास असतात. गडकरींचा ‘पूरक उमेदवार’ म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याची प्रतिक्रिया व्यंकटेश्वरा स्वामी महाराज यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान
महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या दरम्यान लोकसभ निवडणुका पार पडणार आहेत. तुमच्या भागात मतदान कधी होणार, हे जाणून घ्या.
पहिला टप्पा : 19 एप्रिल एप्रिल
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार आहे. पाच मतदारसंघात मतदान होणार आहे. 19 एप्रिलला विदर्भातील सहा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर येथे मतदान होईल.
दुसरा टप्पा : 26 एप्रिल 2024
26 एप्रिल रोजी 8 मतदारसंघात मतदान होणार आहे. वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, अकोला, अमरावती, बुलढाणा या मतदारसंघात मतदान होईल.
तिसरा टप्पा : 7 मे 2024
7 मे रोजी 11 मतदारसंघात मतदान होणार आहे. रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघात मतदान होईल.
चौथा टप्पा : 13 मे 2024
नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या 11 मतदारसंघात 13 मे रोजी मतदान पार पडेल.
पाचवा टप्पा : 20 मे 2024
महाराष्ट्रातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होईल. धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य अशा एकूण 13 मतदारसंघात मतदान पार पडेल.