Home » बंडखोर आमदारांविरोधात अकोल्यात शिवसेनेचा मोर्चा

बंडखोर आमदारांविरोधात अकोल्यात शिवसेनेचा मोर्चा

by नवस्वराज
0 comment

अकोला : एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील मंत्री आणि आमदारांनी पुकारलेल्या बंडखोरीविरोधात अकोल्यात शिवसेनेने मोर्चा काढला. सोमवार, 27 जून रोजी दुपारी मोर्चाला प्रारंभ झाला.


शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख सेवकराम ताथोड, जिल्हा प्रमुख गोपाल दाताकर, आमदार नितीन देशमुख यांच्या आदेशाने युवासेना शहर प्रमुख नितीन मिश्रा, शिवसेना शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात जुने शहरातील श्री राजेश्वर मंदिर परिसरातून मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गांवरुन हा मोर्चा कोतवाली चौकात पोहोचला. यावेळी बंडखोर नेते आणि आमदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

ज्येष्ठ महिला नेत्या मंजुषा शेळके, शिवसेना नेते विजय मालोकार, राहुल कराळे, प्रशांत अढाऊ, संजय अढाऊ, गोपाल भटकर, गजानन वझीरे, नितीन ताकवाले, दिलीप बोचे, विकास पागृत, ज्ञानेश्वर गावंडे, दिनेश सरोदे, अप्पू तिडके यांच्यासह महिला, युवा आघाडीचे कायकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!