Home » पवारांना धमकी देणारा सौरभ निघाला अमरावतीचा

पवारांना धमकी देणारा सौरभ निघाला अमरावतीचा

by नवस्वराज
0 comment

अमरावती : तुमचाही दाभोळकर करू, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना धमकी देणारा सौरभ दाभोळकर हा अमरावतीचा असून भारतीय जनता युवा मोर्चाचा कार्यकर्ता असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. यासदंर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

शरद पवार यांना धमकीचे ट्विट करणारा अमरावतीतील भाजपाचा कार्यकर्ता सौरभ पिंपळकर याला तात्‍काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्‍या कार्यकर्त्यांनी अमरावतीचे पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांची शुक्रवारी भेट घेऊन निवेदन सादर केले. कथित धमकी देणारा सौरभ पिंपळकर हा अमरावतीचा आहे. भाजपा युवा मोर्चाचा कार्यकर्ता आहे. शहरातील बहुचर्चित कॉपी प्रकरणातही तो गुंतलेला आहे. मात्र त्याच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही. भाजपाचे नेते सौरभ पिंपळकरला अभय देत असल्याने त्याने शरद पवार यांच्‍याविरुद्ध जाणीवपूर्वक ट्विट केले आहे. त्यामुळे त्याच्‍यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांना करण्यात आली. कारवाई न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस कठोर भूमिका घेईल, कार्यकर्ते सौरभ पिंपळकरचा समाचार घेतील, असा इशारा राष्‍ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे यांनी दिला. यावेळी माजी महापौर किशोर शेळके, अविनाश मार्डीकर, प्रमोद महल्ले, निलेश शर्मा, प्रशांत महल्ले, ॲड. सुनील बोळे, ऋतुराज राऊत, किशोर भुयार, वाहिद खान, आनंद मिश्रा, प्रा. अजय बोन्डे, बंडू निंभोरकर, दिलीप कडू, अमोल देशमुख, प्रशांत पेठे आदी उपस्थित होते.

कोण आहे सौरभ पिंपळकर?

शरद पवार यांना धमकी देणारा सौरभ पिंपळकर कोण आहे, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. अमरावतीच्या सौरभ पिंपळकरबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, तो अमरावतीच्या गोपालनगर भागातील रहिवासी आहे. भाजयुमोचा तो पदाधिकारी आहे. यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार पोलिसांना प्राप्त झालेली नाही. सध्या सोशल मीडियावर सौरभ पिंपळकर याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबतचे फोटो आता व्हायरल होत आहेत. आम्ही त्याच्यावर लक्ष ठेऊन आहोत, असेही पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले. पवारांना धमकी याचा सौरभ पिंपळकरच्या खात्यावरून देण्यात आली काय, याची शहानिशा करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुंबई पोलिसही याच ट्विटर खात्याची शहानिशा करीत आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!