Home » Lok Sabha Election 2024 : निवडणूक बंदोबस्तासाठी सीमा सुरक्षा दलाची कंपनी दाखल

Lok Sabha Election 2024 : निवडणूक बंदोबस्तासाठी सीमा सुरक्षा दलाची कंपनी दाखल

Akola Police : वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली बच्चन सिंह यांची भेट

0 comment

Akola News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, बंदोबस्तासाठी सीमा सुरक्षा दलाच्या तुकड्या अकोल्यात तैनात करण्यात आल्या आहेत. सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी अकोल्यात पोहोचल्यानंतर पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांची भेट घेतली.

निवडणूक शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी केंद्र सरकारने अकोला जिल्ह्यात 450 कॅडेट्सची बटालियन असलेली केंद्रीय सुरक्षा दलाची एक कंपनी उपलब्ध करून दिली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी अधीक्षक कार्यालयातील विजय हॉलमध्ये कंपनीचे अधिकारी व सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची बैठक घेतली. बटालियनचे नेतृत्व असिस्टंट कमांडर विकास चंद्रा करीत आहेत. या कंपनीत अधिकाऱ्यांसह 71 जवानांचा समावेश आहे. आगामी काळात आणखी सैनिक त्यात सामील होणार असल्याचे सांगण्यात आले.

पोलिस अधीक्षकांनी अकोला लोकसभा मतदारसंघाचे भौगोलिक, सामाजिक, राजकीय, कायदा व सुव्यवस्था आदींबाबत मार्गदर्शन सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना केले. संवेदनशील भागात या तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सध्या आलेल्या तुकडीतील अधिकारी, कर्मचारी अकोला लोकसभा मतदारसंघाचा पूर्ण अभ्यास करणार आहेत. त्यानंतर येणाऱ्या केंद्रीय सुरक्षा दलाच्या अतिरिक्त तुकड्यांना हे अधिकारी मदत करणार आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान सीमा सुरक्षा दलाच्यावतीने जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी व अत्यंत संवेदनशील भागात ‘रूट मार्च’ करण्यात येणार आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!