Home » Sant Gadge Baba : महापालिका कार्यालयात गाडगे बाबांना अभिवादन

Sant Gadge Baba : महापालिका कार्यालयात गाडगे बाबांना अभिवादन

AMC News : जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केले स्मरण

by नवस्वराज
0 comment

Akola : 23 फेब्रुवारी 2024 रोजी संत आणि समाजसुधारक गाडगेबाबा यांच्या 148व्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला उपस्थित मान्‍यवरांच्‍या हस्‍ते संत गाडगेबाबा यांच्‍या प्रतिमेचे पूजन व माल्‍यार्पण करण्‍यात आले. संत गाडगेबाबा यांचे कार्य व जीवनावर प्रकाश टाकणारे विचार यावेळी व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाला स्‍वच्‍छता विभाग प्रमुख प्रशांत राजुरकर, नगर सचिव विभागाचे मंगेश जाधव, गणेश गावंडे, संतोष मोहोकार, दीपक कोकाटे, राहुल माळी, विश्‍वनाथ सुतवणे, भगवान गायकवाड आदी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!