Home » Akola City : गडंकी हिंदू स्मशानभूमीची कडे लक्ष गरजेचे

Akola City : गडंकी हिंदू स्मशानभूमीची कडे लक्ष गरजेचे

Sanatan sanskruti Mahasangh : अकोला महापालिकेकडे केली मागणी

by नवस्वराज
0 comment

Akola News : जुन्या शहरातील गंडकी मार्गावरील हिंदू स्मशानभूमीच्या दुरावस्थेबाबत सनातन संस्कृती महासंघाने अकोला महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्तांना निवेदन देवून लक्ष वेधले आहे. त्याची प्रत पालकमंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांनाही दिली आहे. निवेदनात म्हटले आहे की, जुन्या शहराची लोकसंख्या आणि भौगोलिक विस्तार वाढतो आहे. गंगानगर, जुना बाळापूर नाका, डाबकी रेल्वे गेट ते गडंकीपर्यंतचा भाग जुन्या शहराअंतर्गत येतो. या भागासाठी गडंकी मार्गावर जुनी हिंदू स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीची दूरवस्था झाली आहे. अंत्यसंस्काराच्या ठिकाणावर पत्र्याचे शेड असून ते जुने झाले आहे. लोकांना बसण्यासाठी जो नवीन हॉल बांधला आहे तो पावसाळ्यात गळतो. हॉल व परिसर अत्यंत अस्वच्छ आहे.

निवेदनात पुढे नमूद केले आहे की, महानगरातील मोहता मिल, उमरी आणि कैलास टेकडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्काराचे ओटे व शेडचे पक्के बांधकाम करण्यात आले आहे. लोकांना बसण्यासाठी चांगली व्यवस्था आहे. स्मशानभूमीचा परिसर मोठा असूनही स्वच्छता आहे. दुर्लक्षित हिंदू स्मशानभूमीतील अंत्यसंस्कार करायच्या ठिकाणच्या ओट्यांचे पक्के बांधकाम करण्याची, नवीन हॉलची दुरुस्ती तसेच परिसराच्या कायम स्वच्छतेची व्यवस्था करण्याची मागणी निवेदना द्वारा करण्यात आल्याचे सनातन संस्कृती महासंघाचे प्रसिद्धी प्रमुख विजय केंदरकर, मिलिंद गायकवाड आणि देवानंद गहीले यांनी कळविले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!