Home » Akola Police : ऑनलाइन लॉटरीवर धडक कारवाई

Akola Police : ऑनलाइन लॉटरीवर धडक कारवाई

IPS Bacchan Singh : दोन आरोपींसह हजारोंचा मुद्देमाल जप्त

0 comment

Akola : पोलीस स्टेशन खदान हद्दीतील सिंधी कॅम्प येथील आशा मुव्हीज गिफ्ट गॅलरी च्या बाजूला असलेल्या दुकानामध्ये अवैधरित्या विनापरवाना राजश्री लोटो ऑनलाइन लॉटरीवर जुगार खेळण्यात येत असल्याची माहिती पोलिस सुत्रांना मिळाली. त्यानुसार 6 मार्च रोजी ऑनलाइन जुगार खेळणे सुरू असताना पोलिसांनी छापा घातला. घटना स्थळावरून आरोपी विजयकुमार पंजूमाल उर्फ होलाराम रोहाडा (59) राहणार कच्ची खोली, सिंधी कॅम्प अकोला, अश्विन काशिनाथ सरदार (33) राहणार कैलास टेकडी खदान यांना अटक करण्यात आली. आरोपींना लॉटरी बाबत कागदपत्रांची मागणी केली असता, त्यांच्याजवळ कुठलेही कागदपत्र नव्हते. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींजवळून व घटनास्थळावरून एकूण 63 हजार 470 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यांना पुढील कारवाई करता पोलीस स्टेशन खदान यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला शहराचे पोलिस उपअधिक्षक सतीश कुलकर्णी व त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक माजिदखान पठाण व पोलीस अंमलदार अनिल खडेकार, रवींद्र घिवे, विनय जाधव, राजसिंह चंदेल यांनी ही कारवाई केली आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!