Home » Lok Sabha Election : माझ्या, ‘वंचित’च्या नादाला अजिबात लागू नका

Lok Sabha Election : माझ्या, ‘वंचित’च्या नादाला अजिबात लागू नका

Prakash Ambedkar : अकोल्यातून आंबेडकरांनी दिला काँग्रेसला इशारा

by admin
0 comment

Vanchit Bahujan Aghadi : माझ्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या नादाला अजिबात लागू नका. कपडे फाडण्यात आमच्या इतके एक्सपर्ट कोणी नाही. आम्ही जर काँग्रेसवाल्यांची पोलखोल करत बसलो तर अनेकांना सार्वजनिक ठिकाणी फिरणेही मुश्किल होईल, असा सज्जड दम वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला भरला.

अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आंबेडकर यांनी काँग्रेसचा चांगला समाचार घेतला. योग्य हुंडा मिळाला नसेल म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी कदाचित असा दम भरला असावा, म्महणून आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये आले नसावे, असे विधान काँग्रेसचे दिग्गज नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. वडेट्टीवार यांच्या या विधानाचा बुधवारी प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात खरपूस समाचार घेतला. आम्हाला काय मिळाले आणि काय मिळाले नाही, याचा विचार कोणी करू नये. आम्ही पोल खोलण्यामध्ये तरबेज आहोत. कोणाला किती हुंडा मिळाला हे जर आम्ही काढत बसलो तर, कोणालाही उजळ माथ्याने फिरता येणार नाही, असा दम आंबेडकर यांनी भरला.

राज ठाकरेंवर टीका

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजप आणि मोदींना पाठिंबा दिला. त्यामुळे बिहारमधील कार्यकर्ते जे मुंबईमध्ये राहतात आणि दक्षिणेतील जे कार्यकर्ते आहेत ज्यांना भाजप जवळची वाटत होती त्यांना असुरक्षित वाटू लागले आहे. मुंबई सारख्या शहरात मनसे किंवा शिवसेना यांनी अगोदर आंदोलन उभे केले होते. लुंगी हटाव, पुंगी बजाव असे ते आंदोलन होते. त्यानंतर उत्तर भारतीयांच्या विरोधातले आंदोलन उभे केले गेले. मनसेने धारावी या ठिकाणी छ्ट पूजेला विरोध केला. बिहारमधील लोकांना मारहाण केल्याची आठवणही आंबेडकर यांनी करुन दिली.

मुंबईचे उमेदवार आम्ही जाणीवपूर्वक जाहीर केले नाहीत. त्याचे कारण की, निवडणूक सुरू झाल्यानंतर मनसेचा पाठिंबा भाजपवाले घेतील हे ठाऊक होते. ते झाले की, मुंबईमधील पूर्ण गणित बदलेल हे माहिती होते. त्यासाठीच आम्ही थांबलो होतो. आता आम्ही मुंबईमधील उमेदवार जाहीर करणार असल्याचेही आंबेडकर म्हणाले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!