अश्विन पाठक | Ashwin Pathak
Akola : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काळामारोती प्रभात शाखेतर्फे 4 फेब्रुवारी रोजी रक्तदान व रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी दरवर्षी शाखेतर्फे रक्तदान शिबिर घेण्यात येते. दीपप्रज्वलन आणि भारतमातेच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.
‘नमोचषक’ कुस्ती स्पर्धेत यश मिळवल्या बद्दल दीपक मुदीराज यांचा ज्येष्ठ स्वयंसेवक शांतीलालजी खंडेलवाल यांचे हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शिबिरात 28 नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून समाजकार्यात योगदान दिले. त्यांना रक्तदान केल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले.
रक्तदान शिबिरासाठी डॉ. हेडगेवार रक्तपेढीने मोलाचे सहकार्य केले. गजानन रेलकर, मनोहर गंगाखेडकर, प्रकाश ढोरे, मनिष पाथरकर, वासुदेव मोरे, प्रसाद परचुरे, आनंद उगले, सुनिल खोत, किशोर सुदलकर, नामदेव नरवाडे, मुकुंद कुळकर्णी, बाळू कोरडे, नरेंद्र परचुरे, वैभव मोरे, रमेश अलकरी, सचिन मुदीराज, मधुकर फंदाट, प्रसन्न मोरे, हर्षल उगले, प्रदीप खोसे, ओम मोरे, अमोल हातेकर यांनी शिबिरासाठी परिश्रम घेतले.