Home » अकोल्यातून आणखी एक पंढरपूर एक्स्प्रेस रवाना

अकोल्यातून आणखी एक पंढरपूर एक्स्प्रेस रवाना

by नवस्वराज
0 comment

अकोला : सामान्य वारकऱ्यांना विविध मार्गाने पंढरपूरला जाणे परवडत नसल्याने केंद्र सरकार ने वारकऱ्यांसाठी रेल्वे सेवा सुरू केली आहे. या रेल्वे सेवेमुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे मोदी सरकारचे मानावे तेवढे आभार कमीच आहे असे प्रतिपादन भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अशोक ओळंबे यांनी केले.

पंढरपूरला जाणाऱ्या आषाढी एक्सप्रेसचे अकोल्यात आगमन झाले त्यावेळी एक्सप्रेसच्या स्वागता प्रसंगी डॉ. ओळंबे बोलत होते. आषाढी एक्सप्रेस ने प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांना डॉ. ओळंबे यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. यावेळी ट्रेनचा लोको पायलट यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

रेल्वे समितीचे सदस्य व भाजपा विधी आघाडी प्रमुख अॅड सुभाषसिंह ठाकूर, भाजपा सदस्य संजय चौधरी, माजी नगरसेवक गोपी ठाकरे, भाजपा सरचिटणीस अक्षय गंगाखेडकर, धनंजय गिरधर यांनी विशेष यात्री गाडीला हिरवी झेंडी दाखवून वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला श्रीकांत एखंडे, विजय मोटे, विजय काकड, रवींद्र जैन, सचिन बोरेकर, राजेश मिश्रा, प्रभाकर वानखडे, गजानन गोलाईत, दीपक गवारे, भाऊराव साबळे, सोनू उज्जैनकर, शेखर शेळके, सुरेश अंधारे, राजेश घाटोळे, किशोर वडतकर, राजकुमार गायकवाड आदी उपस्थित होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!