Home » Akola Police : जिल्ह्यातील आणखी एक गुन्हेगार स्थानबद्ध

Akola Police : जिल्ह्यातील आणखी एक गुन्हेगार स्थानबद्ध

IPS Bacchan Sing : अकोट येथील पोलिस ठाण्यात होतील गुन्ह्यांची नोंद

0 comment

Crime News : अकोट शहरातील ईफ्तेगार प्लॉट येथे राहणारा कुख्यात गुंड शाकीर खान बिस्मिल्ला खान (वय 35) याला जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी तयार केलेल्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी मंजुरी प्रदान केली.

शाकीरवर जबरी चोरी, दुखापत, हल्ला करणे, अतिक्रमण करणे, इच्छापूर्वक जबर दुखापत पोहचविणे, घातक हत्यारांनी इजा करणे, शांतता भंग करणे, धमकी देणे, बेकायदेशिर शस्त्र बाळगणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. शाकीरवर यापूर्वी विविध कलमान्वये प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली होती. मात्र तो गुन्हे करीतच होता. त्यामुळे गंभीर दखल घेत पोलिसांनी येवुन कुख्यात शाकीर खान बिस्मिल्ला खान याला स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा दंडाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला.

जिल्हा दंडाधिकारी कुंभार यांनी शाकीरला एक वर्षासाठी अकोला जिल्हा कारागृहात येथे स्थानबद्ध ठेवण्याबाबतचा आदेश दिला. त्यानुसार शाकीर खान बिस्मिल्ला खान याचीरवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली. अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, अकोटचे उपअधीक्षक अनमोल मित्तल, स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक शंकर शेळके, उपनिरीक्षक आशिष शिंदे, कर्मचारी ज्ञानेश्वर सैरिसे, उदय कुलट, अकोट शहरचे पोलिस निरीक्षक तपन कोल्हे, कर्मचारी नंदकिशोर यांनी ही कारवाई केली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!