Home » Lok Sabha Election : वर्ध्यात देवेंद्र फडणवीसांची दांडी अन‌् रॅलीत मग जे झाले ते..

Lok Sabha Election : वर्ध्यात देवेंद्र फडणवीसांची दांडी अन‌् रॅलीत मग जे झाले ते..

Wardha Constituency : उमेदवाराच्या प्रचारार्थ रॅलीत झालीच नाही गर्दी

by नवस्वराज
0 comment

 

BJP Politics : उमेदवाराच्या अर्ज दाखल करण्याच्या रॅलीला देवेंद्र फडणवीस यांनी ऐनवेळी दांडी मारल्याने वर्धा येथे रॅलीत तुरळक लोकच सहभागी झालेत. त्यामुळे वर्धेतील हा प्रकार राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरला आहे. रॅली शक्ती प्रदर्शन करणारी असावी असा प्रमुख पक्षांचा हेतू असतो. त्यामुळे गर्दी जमविण्याचे सर्व ते सोपस्कार पार पाडले जातात. अशात वर्ध्यात देवेंद्र फडणवीस सहभागी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र वेळेवर त्यांनी सहभाग टाळला.

लोकांना ही बाब कळल्यानंतर अनेकांनी सहभाग टाळला. त्यामुळे उमेदवार रामदास तडस यांनाच आपल्या रॅलीची सुत्रे सांभाळावी लागली. आमदार डॉ. पंकज भोयर, समीर कुणावार, दादाराव केचे, रामदास आंबटकर, खासदार डॉ. अनिल बोंडे, प्रताप अडसड, सुनील गफाट, राजेश बकाने यांच्या उपस्थितीत तडस यांनी अर्ज दाखल केला. वर्धा येथे रॅली निघाली तेव्हा आमदार कुणावार हे रस्त्यालगत उभ्या लोकांना चला, चला, करीत विनवणी करीत होते. मात्र रॅलीत तुरळकच लोक सहभागी झालेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत अमर काळे यांची रॅली काढण्यात आली होती. शहरात ही रॅली चर्चेचा विषय ठरली होती. त्याचीच तुलना नागरिक भाजपच्या रॅलीदरम्यान करीत होते. ‘आज मजा नही आया’ असे अनेकांचे म्हणणे होते. यावर भाजपचे लोकसभा मतदारसंघ प्रचार प्रमुख सुमित वानखेडे म्हणाले की, आमचे एवढेच नियोजन ठरले होते. शक्ती प्रदर्शन प्रकार नव्हता. भविष्यात अनेक कार्यक्रम आहेत. भाजपची मुख्य लढाई ही बुथ पातळीवरील आहे. गर्दी, मोठ्या सभा असे काही प्रकार नाहीत. भाजपचे हे असे प्रचारतंत्र असले तरी सर्व सामान्य जनतेने मात्र रॅली फसली असे मानले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!