Home » नितीन गडकरींनी घेतली धोत्रे, शर्मांच्या परिवाराची भेट

नितीन गडकरींनी घेतली धोत्रे, शर्मांच्या परिवाराची भेट

by नवस्वराज
0 comment

अकोला : केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी रविवार, ११ जून २०२३ रोजी अकोल्यात खासदार संजय धोत्रे व आमदार गोवर्धन शर्मा यांच्या परिवाराची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून खासदार धोत्रे व आमदार शर्मा आजारी असल्यामुळे उपचार घेत आहेत.

खासदार संजय धोत्रे यांच्या निवासस्थानी सुहासिनी धोत्रे, समिक्षा धोत्रे, डॉ. रणजित सपकाळ, आमदार रणधीर सावरकर, मंजुषा सावरकर, प्रवीण सावरकर उपस्थित होते. आजारी असलेल्या धोत्रे यांची गडकरी यांनी आतापर्यंत तीनदा भेट घेतली आहे. आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निवासस्थानी गंगादेवी शर्मा, कृष्णा शर्मा, अर्चना शर्मा, आरती शर्मा, अनुप शर्मा आदी उपस्थित होते. आमदार वसंत खंडेलवाल यांच्या निवासस्थानी सुद्धा भेट देऊन नितीन गडकरी यांनी मदनलाल खंडेलवाल यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

अकोल्यात पोहोचल्यानंतर गडकरी यांचे विमानतळावर स्वागत करण्यात आले. भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, माजी महापोर विजय अग्रवाल, माजी आमदार बळीराम सिरस्कार, प्रवीण पोटे पाटील, अर्चना मसने, योगिता पावसाळे, किशोर मांगटे पाटील, जयंत मसने, विजय मालोकार, वसंत बाछुका, संजय गोडा, संजय जिरापुरे, संजय गोटफोडे, देवाशिष काकड, संतोष पांडे, राजेंद्र गिरी, गणेश अंधारे, अमोल गोगे, डॉ.अमित कावरे, सागर शेगोकार, पवन महल्ले, अक्षय जोशी, कृष्णा शर्मा, अनुप धोत्रे, माधव मानकर, रामप्रकाश मिश्रा, रमेश आप्पा खोबरे, विजय गुल्हाने, सिद्धार्थ शर्मा, शंकर वाकोडे राजेश बेले, मोहन पारधी, अंबादास उबाळे, अमोल साबळे, गिरीश जोशी, रामदास सरोदे, राजू थोरवे, संजय जोशी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

गडकरी यांनी न्यू तापडिया नगर, डाबकी रोड, नवीन बायपास बार्शीटाकळी उड्डाणपूल, अकोट-अकोला रोड, बडनेरा पारस फाटा, अकोला हैदराबाद रोड आदी कामांचाही यावेळी आढावा घेतला. अकोला खंडवा रेल्वे मार्गाची प्रगतीही त्यांनी जाणून घेतली. अकोला विमानतळ आदी विविध विषयांवर केंद्राच्या कार्यक्षेत्रात असलेल्या विषयाकडे लक्ष देण्याची ग्वाहीही गडकरी यांनी दिली. अकोल्यातून प्रस्तावित असलेल्या नव्या रेल्वे गाड्यांची माहितीही गडकरी यांनी यावेळी घेतली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!